मिरज-निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेसला सांगलीत थांबा; गुजरात, राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची सोय

By शीतल पाटील | Published: August 16, 2023 07:10 PM2023-08-16T19:10:41+5:302023-08-16T19:12:47+5:30

सांगली : मिरज - निजामुद्दीन दिल्ली दर्शन एक्सप्रेसला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची ...

Miraj Nizamuddin Darshan Express stop at Sangli | मिरज-निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेसला सांगलीत थांबा; गुजरात, राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची सोय

मिरज-निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेसला सांगलीत थांबा; गुजरात, राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची सोय

googlenewsNext

सांगली : मिरज - निजामुद्दीन दिल्ली दर्शन एक्सप्रेसला सांगलीरेल्वे स्थानकावर थांबा मिळाला आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सांगलीत मिरज- निजामुद्दीन एक्सप्रेसला थांबा नव्हता. जिल्ह्यातील असंख्य लोकांची दिल्ली, गुजरात, राजस्थानला प्रवास करीत असतात. पण आता या रेल्वेगाडीला सांगलीत थांबा देण्यात आल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. दर्शन एक्सप्रेस प्रत्येक रविवारी सकाळी ५ वाजता सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटून कराड, सातारा, ,पुणे, कल्याण, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा येथे थांबून दिल्लीच्या निजामुद्दीन स्टेशनला दुसऱ्या दिवशी सकाळी ६,४५ वाजता पोहोचेल. 

परतीच्या प्रवासात ही गाडी दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशन वरून प्रत्येक शुक्रवारी रात्री ९.४० वाजता सुटणार आहे. सांगलीत शनिवारी रात्री १२.४५ वाजता पोहोचेल. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सांगली रेल्वे स्टेशनवरून थेट कोटा येथे जाण्यासाठी गाडी उपलब्ध झाली आहे.

Web Title: Miraj Nizamuddin Darshan Express stop at Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.