मिरज पंचायत समिती सभापतीची ५ जानेवारीस निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:22 AM2020-12-25T04:22:10+5:302020-12-25T04:22:10+5:30
निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच इच्छुक महिला सदस्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी ...
निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच इच्छुक महिला सदस्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी संघटना या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उमेदवारी दाखल करून प्रसंगी उपसभापती निवडीत सत्ताधारी भाजपमधील एका गटाला पाठिंबा देऊन निवडीत रंगत आणली होती. आता सभापती निवडीत त्यांची भूमिका काय असणार की ते निवडीपासून अलिप्त राहणार, याकडे लक्ष लागून आहे.
चौकट
निवड बिनविरोध की चीठ्ठीने!
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यापूर्वीच्या निवडीत सहभाग घेतल्याने सत्ताधारी भाजपच्या नेत्यांची धावपळ उडाली होती. याची दखल घेऊन भाजपमधील फूट टाळण्यासाठी सभापती निवड चिठ्ठीच्या माध्यमातून करण्याचा पायंडा भाजप नेत्यांनी पाडला. सध्याची निवड बिनविरोध करावी, असा सूर सत्ताधारी भाजपमधून आहे. त्यामुळे सभापती निवड बिनविरोध होणार की चिठ्ठ्या टाकून, याबाबत नेत्यांच्या भूमिकेकडे सदस्यांचे लक्ष लागून आहे.