दुहेरीकरणाच्या कामासाठी मिरज-पुणे एक्स्प्रेस रद्द, काही गाड्या विलंबाने धावणार

By अशोक डोंबाळे | Published: March 25, 2024 06:05 PM2024-03-25T18:05:25+5:302024-03-25T18:05:54+5:30

सांगली : रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विविध अभियांत्रिकी कामांसाठी दि. २९ पर्यंत जरंडेश्वर-सातारा दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मिरज- ...

Miraj-Pune Express canceled for doubling work, some trains will run late | दुहेरीकरणाच्या कामासाठी मिरज-पुणे एक्स्प्रेस रद्द, काही गाड्या विलंबाने धावणार

दुहेरीकरणाच्या कामासाठी मिरज-पुणे एक्स्प्रेस रद्द, काही गाड्या विलंबाने धावणार

सांगली : रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विविध अभियांत्रिकी कामांसाठी दि. २९ पर्यंत जरंडेश्वर-सातारा दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मिरज-पुणे मार्गांवरील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या विलंबाने धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दि. २६ रोजी गाडी क्रमांक ०१४२३ पुणे-मिरज एक्स्प्रेस व गाडी क्रमांक ०१४२४ मिरज-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

पुढील गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक ११०३० कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून दि. २६ व २९ रोजी कोल्हापूरहून तिच्या नियमित सुटण्याच्या वेळेऐवजी एक तास उशिराने रात्री ९.४५ वाजता सुटेल. 

गाडी क्रमांक १२१४७ कोल्हापूर येथून दि. २६ रोजी सुटणारी कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस कोल्हापूरहून तिच्या नियमित सुटण्याच्या वेळेऐवजी १०.४५ वाजता, म्हणजे दीड तास उशिराने सुटेल. 

गाडी क्रमांक ११४२६ कोल्हापूर-पुणे डेमू कोल्हापूर येथून दि. २७, २८ व २९ रोजी कोल्हापूरहून तिच्या नियमित वेळेच्या दोन तासांनी उशिरा सायंकाळी ७ वाजता सुटेल. गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Miraj-Pune Express canceled for doubling work, some trains will run late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.