चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे मिरज-सांगलीत घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 02:40 PM2020-08-29T14:40:04+5:302020-08-29T14:41:30+5:30
‘दार उघड उद्धवा दार उघड’, अशी घोषणा देत मिरज येथे सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीने तर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. मिरजेतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
मिरज/सांगली : ‘दार उघड उद्धवा दार उघड’, अशी घोषणा देत मिरज येथे सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीने तर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. मिरजेतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
राज्यातील मंदिरे त्वरीत उघडावी या मागणीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मैदान दत्त मंदिर मिरज येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
घंटा, टोल, झांजा, टाळ, चिपळ्या, शंख आदी वाद्य सहित महाआरती करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, की गेले सहा महिने राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत, राज्य सरकार दारू दुकान उघडते तर मंदिर का बंद ठेवते. हे शासन अश्रद्ध शासन आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा देवतांवर विश्वास होता, पण कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस ही दोन भुते बरोबर घेतल्याने मुख्यमंत्री ठाकरे सुद्धा अश्रद्ध झाले असावेत.
यावेळी भाजपा सांस्कृतिक आघाडी जिल्हा प्रमुख ओमकार शुक्ल, महापालिका सभापती संदीप आवटी, नगरसेवक पांडुरंग कोरे, नगरसेवक निरंजन आवटी, माजी महापौर संगीता खोत, सरचिटणीस मोहन वाटवे, श्रीकांत शिंदे, महादेव अण्णा कुरणे डॉ भालचंद्र साठे, गणेश चौगुले, जयगोंड कोरे, बाबासाहेब आळतेकर, शीतल पाटोळे राजेंद्र नातू, सुजाता रक्तवान, ज्योती कांबळे, रुपाली देसाई, अनघा कुलकर्णी माधुरी मिसाळ, जितेंद्र ढोले, तानाजी घार्गे, गजेंद्र कुल्लोळी, हृषिकेश कुलकर्णी, किशोर पटवर्धन, अजिंक्य हंबर, शानवाज सौदागर, साजिदआली पठाण, श्रीकांत महाजन, गजानन जाधव, संदीप कबाडे, महेश फोंडे, नाना मेंढे, अमरसिंग चव्हाण, शंकर इसापुरे, महेश फोंडे