मिरज तालुक्यात दोन्ही कॉँग्रेसची भाजपशी लढत--ग्रामपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:20 PM2017-10-09T22:20:36+5:302017-10-09T22:22:23+5:30

मिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मिरज पूर्व भागात भाजप विरुध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरुध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीत लढत

 In Miraj taluka, the two Congress fight with BJP - Gram Panchayat elections | मिरज तालुक्यात दोन्ही कॉँग्रेसची भाजपशी लढत--ग्रामपंचायत निवडणूक

मिरज तालुक्यात दोन्ही कॉँग्रेसची भाजपशी लढत--ग्रामपंचायत निवडणूक

Next
ठळक मुद्दे : पूर्व व पश्चिम भागात समीकरणे वेगळीकाँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुध्द राष्टÑवादी अशी लढत

सदानंद औंधे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मिरज पूर्व भागात भाजप विरुध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरुध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीत लढत होत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे गट सोयीस्कर भूमिकेत आहे. मिरज पूर्व भागात काँग्रेस व राष्टÑवादी एकत्र आल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळविणाºया भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत यशासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
मिरज पूर्व भागात काँग्रेसच्या मदन पाटील गटाचे वर्चस्व होते; मात्र पूर्व भागात पंचायत समितीच्या दहा व जिल्हा परिषदेच्या चार जागा जिंकून भाजपने येथे वर्चस्व निर्माण केले आहे. काँग्रेस व राष्टÑवादीच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी खा. संजय पाटील व आ. सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केल्याने पूर्व भागातील काही ग्रामपंचायतींत भाजपची सत्ता आहे. ग्रामपंचायतींसाठी भाजपविरुध्द काँग्रेस व राष्टÑवादी अशी लढत होत आहे. बेडग, गुंडेवाडी, बोलवाड, खटाव, कदमवाडी, खंडेराजुरी, बेळंकी, सावळी, टाकळी, सलगरे, वड्डी, संतोषवाडी, पाटगाव, सिध्देवाडी, पायापाचीवाडी, सोनी या मिरज पूर्व भागात भाजप नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. खंडेराजुरीत भाजप व काँग्रेससमर्थक एकत्र येऊन निवडणूक लढवित आहेत. सोनीत घोरपडे गट व भाजप एकत्र आहेत. मात्र अन्य काही ठिकाणी घोरपडे गट भाजपविरोधात आहे. बेडग येथे भाजपमधील दोन गट विरुध्द काँग्रेस अशी लढत आहे. पूर्व भागात जि. प. व पंचायत समिती निवडणुकीत यश मिळविणाºया भाजपला काँग्रेस व राष्टÑवादीने आव्हान दिले आहे. मिरज पश्चिम भागात राष्टÑवादीचे वर्चस्व आहे. मिरज पश्चिम भागातील दुधगाव, हरिपूर, जानराववाडी, कसबे डिग्रज, कानडवाडी, खरकटवाडी, काकडवाडी, बुधगाव, बिसूर, माधवनगर, मौजे डिग्रज, माळवाडी, मानमोडी, नरवाड, नांद्रे, सावळवाडी, समडोळी, पद्माळे, रसूलवाडी, सांबरवाडी, बामणोली या निवडणुकांसाठी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना एकत्र आल्या आहेत.
काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुध्द राष्टÑवादी अशी लढत आहे. पश्चिम भागात बुधगाव व हरिपूर वगळता काँग्रेस, राष्टÑवादीच्या तुलनेत भाजपची ताकद अपुरी आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करणे भाजपसाठी कठीण ठरणार आहे.

वर्चस्व टिकविण्याचे : काँग्रेससमोर आव्हान

ग्रामपंचायत निवडणुकांत सरपंचांची थेट मतदारांतून निवड होणार असल्याने अ
नेक गावांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. निवडणूक होत असलेल्या बहुसंख्य ग्रामपंचायतीत काँग्रेसचेच वर्चस्व होते; मात्र तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व टिकविण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.

Web Title:  In Miraj taluka, the two Congress fight with BJP - Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.