मिरज पश्चिममध्ये दमदार लढती--ग्रामपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:30 PM2017-09-27T23:30:52+5:302017-09-27T23:31:38+5:30

कसबे डिग्रज : इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज मंडलमधील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, दुधगाव, सावळवाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार

Miraj West's strong fight - Gram Panchayat elections | मिरज पश्चिममध्ये दमदार लढती--ग्रामपंचायत निवडणूक

मिरज पश्चिममध्ये दमदार लढती--ग्रामपंचायत निवडणूक

googlenewsNext
ठळक मुद्देस्थानिक गटही ताकद दाखविणार, राष्टÑवादीविरोधात आघाड्या होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज मंडलमधील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, दुधगाव, सावळवाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघाले आहे. राष्टÑवादी निवडणूक लढवीत असताना कॉँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, भाजप काही ठिकाणी एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

मौजे डिग्रजमध्ये राष्टÑवादीविरोधात सारे एकत्र अशी स्थिती आहे. पण जिल्हा पातळीवर पद भूषविलेले कॉँग्रेसचे एक पदाधिकारी राष्टÑवादीच्या गटाबरोबर जाण्याच्या तयारीत आहेत. बाजार समिती संचालक कुमार पाटील, शेतकरी संघटनेचे सुनील फराटे, प्रकाश कोळी, सौ. संयोगीता कोळी, राष्टÑवादीचे भालचंद्र पाटील याचप्रमाणे लोंढे गट आदींच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणाºया आहेत.

समडोळीमध्ये यावेळी दमदार निवडणूक होणार आहे. गतवेळी राष्टÑवादीच्या वैभव पाटील यांनी सर्वपक्षीय आघाडीने विरोध करुन १७-० अशी ग्रामपंचायत जिंकली होती. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील व माजी सरपंच राष्टÑवादीचे वैभव पाटील एकत्र येताना दिसत आहेत, तर माजी सरपंच ज्येष्ठ नेते महावीर चव्हाण, स्वाभिमानीचे संजय बेळे हे एकत्र आले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील, अप्पासाहेब पाटील यांच्या भूमिका निर्णायक ठरणाºया आहेत. त्याचबरोबर भाजपचे अजित ढोले पॅनेल करण्याच्या तयारीत दिसतात. सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आहे.

दुधगावमध्ये गतवेळच्या निवडणुकीपेक्षा यावेळी मोठी वेगळी स्थिती आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडमुठे विजयी झाल्याने खा. राजू शेट्टींच्या गटात मोठे महत्त्व आले आहे. कॉँग्रेसचा एक गट सक्रिय आहे. माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद आवटी, विलास आवटी, संदेश आडमुठे गट, बाबासाहेब सांद्रे यांच्या भूमिका निर्णायक ठरणाºया आहेत. निवडणूक लक्षवेधी ठरणारी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार, अशी परिसरात चर्चा आहे.

सावळवाडीत माणगावे गट, नितीन दणाणे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ताकद दाखविणारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गट सत्तेसाठी लढणार आहे. तुंग येथील वसंतदादा कारखाना माजी संचालक सचिन डांगे व स्वाभिमानीच्या पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री सचिन डांगे यांची भूमिका मतदार संघात महत्त्वाची आहे.एकंदरीत खा. राजू शेट्टी, जयंत पाटील, सदाभाऊ खोत, विशाल पाटील आपापले समर्थक निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कसबे डिग्रजमध्ये : गुंतागुंतीची समीकरणे
कसबे डिग्रजमध्ये राष्टÑवादी विरुध्द ग्रामविकास आघाडी अशी प्रमुख लढत होणार आहे, पण राष्टÑवादीचा एक गट सवतासुभा मांडून आहे. आ. जयंत पाटील यांनाही हा गुंता सोडविता आला नाही. राष्टÑवादीचे आनंदराव नलवडे, मोहनराव देशमुख, सरपंच अण्णासाहेब सायमोते, कुमार लोंढे सक्रिय झाले आहेत. अजयसिंह चव्हाण पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्यासोबत होते; पण ते स्वतंत्र राष्टÑवादी गट म्हणून सक्रिय आहेत. कॉँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, उद्योजक बाळासाहेब शिंदे यांना अनेक मातब्बर ज्येष्ठांची साथ दिसत आहे. स्वाभिमानी व सदाभाऊ खोत भाजप गट यांच्यासोबत जाणार का, असा प्रश्न आहे.

Web Title: Miraj West's strong fight - Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.