मिरजेत दर्गा ऊरूसास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:27 AM2021-03-10T04:27:05+5:302021-03-10T04:27:05+5:30
मिरज : मिरजेतील ऐतिहासिक मीरासाहेब दर्ग्याच्या उरूसानिमित्त मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उरुसास प्रतिबंध ...
मिरज : मिरजेतील ऐतिहासिक मीरासाहेब दर्ग्याच्या उरूसानिमित्त मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उरुसास प्रतिबंध केल्याने दर्ग्याकडे जाणारे रस्ते बॅरिकेटस लावून बंद करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दर्ग्याच्या ६४६ वा उरूसास मंगळवारी प्रारंभ झाला. मात्र, प्रशासनाच्या प्रतिबंधामुळे मोजक्या जणांच्या उपस्थितीत संदल, चर्मकार बांधवांचा मानाचा गलेफ यासह अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले. दर्ग्यात संगीत सभा व भाविकांना प्रवेशास मज्जाव करण्यांत आला आहे. कोविड साथीमुळे गतवर्षीही दर्गा ऊरुसास प्रतिबंध करण्यांत आला होता. यामुळे शेकडो वर्षात प्रथमच दर्गा ऊरुसाची व संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ संगीत महोत्सवाची परंपरा सलग दोन वर्षे खंडित झाली आहे. कोरोनामुळे यावर्षीही दर्गा ऊरुसास प्रतिबंधामुळे दर्गा आवारात मोजक्या लोकांची उपस्थिती होती. दर्ग्याकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.