मिरजेत मेथे गुरुजींचा स्मृतिदिन सामाजिक उपक्रमांनी साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:46+5:302021-07-12T04:17:46+5:30
मिरज : मिरजेतील ज्येष्ठ नेते जोतिराम मेथे गुरुजी यांचा स्मृतिदिन व वनराज संजय मेथे यांचा वाढदिवस वॄक्षारोपण, रक्तदान ...
मिरज : मिरजेतील ज्येष्ठ नेते जोतिराम मेथे गुरुजी यांचा स्मृतिदिन व वनराज संजय मेथे यांचा वाढदिवस वॄक्षारोपण, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, पोलिसांसह रिक्षाचालकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप अशा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
ज्येष्ठ नेते अनिलभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते प्रताप विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी, उपचार व रक्तदान शिबिराचे उद्घाटन रेल्वे पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश आवटी, माजी उपमहापौर प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे, संजय मेथे, पृथ्वीसिंह नाईक, पृथ्वीराज पाटील यांनी शिबिराला भेट दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. नगरसेवक निरंजन आवटी, पृथ्वीराज पवार, जनसुराज्य पक्षाचे समित कदम, ॠतुराज मेथे, मोहन व्हनखंडे, सुरेखा पाटील, सुमित ठाणेदार, शिवसेनेचे किरण रजपूत यांच्या हस्ते कीट वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. नम्रता मेथे, डॉ. श्रीधर आवटी, डाॅ. प्रियांका मेथे यांनी रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत औषधे दिली. मिरज वाहतूक शाखा, रिक्षा संघटना, रेल्वे पोलिसांना मास्क, सॅनिटायझर व फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत शिंदे, नेताजी सुरवंशी, धनंजय भिसे उपस्थित होते.