विश्वविक्रमी सतारवादनात मिरजेचे कलाकार सहभागी
By admin | Published: March 9, 2016 11:58 PM2016-03-09T23:58:16+5:302016-03-10T01:28:25+5:30
या कार्यक्रमात विश्वविक्रमी सतारवादनासाठी मिरजेतील तरूण तंतुवाद्य निर्माते दिल्लीला रवाना
प्रगती टाटिया : मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे उद्घाटन
दौंड : महिलांनी जिद्द आणि चिकाटीने सर्वांगीण विकास साधून आपला आर्थिक पाया भक्कम करावा, असे मत प्रगती टाटिया यांनी व्यक्त केले.
नवयुग शिक्षण संस्थेत मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
पैसा हेच माध्यम नसून यापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी असते. त्यानुसार नवयुग शिक्षण संस्थेतील ५0 गरीब विद्यार्थिनींना ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय मी घेतला आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थिनींना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येईल, की जेणेकरून कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देता येईल, किंवा ब्युटी पार्लरच्या माध्यमातून मिळवलेला पैसा शिक्षणाच्या कामास येऊ शकतो. साधारणत: हा उपक्रम महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी राबवणार असल्याचे प्रगती टाटिया म्हणाल्या. या वेळी नवयुग शिक्षण संस्थेच्या शिक्षिका रश्मी माखिजा यांनी प्रगती टाटिया यांचा सत्कार केला.
दौंड परिसरातील देवकीनगर येथील नानासाहेब तात्याबा पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महिला दिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिला तसेच विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
आशा ठोंबरे, ज्योती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कविता, उखाणे सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सारिका बेले यांनी केले, तर वैशाली निकाळजे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेचे परीक्षण विमल जाधव, डॉ. ज्योती दीक्षित यांनी केले.
चौकट
आरोग्याची माहिती
दौंड : दौंड रेल्वे महिला सेवा समितीच्या वतीने सिनिअर इन्स्टट्यिूट येथे महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. मीना भड यांनी महिलांचे आरोग्य व संतुलित आहार यावर मार्गदर्शन केले. डॉ. शलाका कारंडे, ॲड. अरुणा डहाळे, रेखा चिंचरे, पूनम शुक्ला यांनी मनोगत व्यक्त केले. सविता सरागे यांनी सूत्रसंचालन केले. राजश्री मुरटे यांनी आभार मानले.
फोटो ओळ : दौंड शिक्षण संस्थेतील गरीब विद्यार्थिनींना मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण प्रगती टाटिया यांनी सुरू केल्यामुळे त्यांचा सत्कार करताना रश्मी माखिजा.
09032016-िं४ल्लि-14
(प्रगती टाटिया या आपल्या ऑयकॉन असून ऑयकॉन प्रसिद्धीच्या वेळी त्यांची जाहिरात आहे. यासंदर्भात जाहिरात विभागाचे अशोक शिंदे यांच्याशी चर्चा झालेली आहे. कृपया फोटोसह बातमी घेणे.)