मिरजेत पंचरंगी लढतीने चुरस

By admin | Published: October 1, 2014 11:21 PM2014-10-01T23:21:13+5:302014-10-02T00:07:09+5:30

फटका कोणाला? : बंडखोर, शिवसेनेमुळे भाजप, काँग्रेससमोर आव्हान

Mirjayet Pancharini fought with the fight | मिरजेत पंचरंगी लढतीने चुरस

मिरजेत पंचरंगी लढतीने चुरस

Next

सदानंद औंधे--मिरज-युती व आघाडी संपुष्टात आल्याने मिरजेतील विधानसभा निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवाराच्या मतविभागणीचा फटका भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस बंडखोर यांच्यात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज मतदारसंघात गतवेळी भाजपने विजय मिळविला. मात्र यावेळी परिस्थिती बदलली आहे. गेल्या पाच वर्षात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी आ. सुरेश खाडे यांचे फारसे सख्य नव्हते. आता तर, युतीच तुटल्याने शिवसेना कार्यकर्त्यांना त्याचे उट्टे काढण्याची संधी मिळाली आहे. पूर्व भागातील रस्ते, म्हैसाळचे पाणी या प्रश्नावरून मतदारांत असलेल्या नाराजीचा आ. सुरेश खाडे यांना सामना करावा लागणार आहे. पूर्व भागातील गावांत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात भाजपला मदत केली होती. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत राष्ट्रवादीची भाजपला मदत मिळणे दुरापास्त आहे. जयंत पाटील यांच्या दबावामुळे घोरपडे समर्थक राष्ट्रवादी कार्यकर्ते बाळासाहेब होनमोरे यांच्या प्रचारात दिसत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते भाजपला धडा शिकविण्याची घोषणा करीत आहेत. शिवसेनेतर्फे तानाजी सातपुते या एकेकाळच्या खाडे यांच्या समर्थकाला उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊन त्याचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री पतंगराव कदम यांचे समर्थक सिध्दार्थ जाधव यांना उमेदवारी दिल्याने माजी मंत्री मदन पाटील व प्रतीक पाटील समर्थक अ‍ॅड. सी. आर. सांगलीकर या आर्थिकदृष्ट्या मातब्बर उमेदवाराने बंडखोरी केली आहे. यामुळे मिरज तालुक्यातील मदन पाटील यांचे समर्थक कोणती भूमिका घेणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंद डावरे यांना जनसुराज्य पक्षाची उमेदवारी मागे घेतली आहे. मंत्री जयंत पाटील यांच्या गटात प्रवेश केलेले काँग्रेसचे बाळासाहेब होनमोरे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आल्याने, मतविभागणीची शक्यता आहे. मिरजेत अल्पसंख्याक मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने अल्पसंख्याकांची गठ्ठामते मिळाल्यास काँग्रेस उमेदवाराची सरशी होऊ शकते. मात्र राष्ट्रवादी व काँग्रेस बंडखोर यांच्यामुळे अल्पसंख्याक मतांची विभागणी होऊ नये यासाठी काँग्रेस नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. मनसेचे उमेदवार नितीन सोनवणे यांचा कितपत प्रभाव पडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच सदस्य असतानाही, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत छुप्या मदतीच्या बळावर मिरजेत मताधिक्य मिळविणाऱ्या भाजपला यावेळी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, सुनील होवाळे, उमेश धोंडे, जयकुमार निकम, प्रकाश बाबर, प्रतीक्षा सोनवणे, संजीव पोकरे हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत.

मिरज
एकूण मतदार ३,०१,२००
नावपक्ष
सुरेश खाडेभाजप
सिध्दार्थ जाधवकाँग्रेस
बाळासाहेब होनमोरे राष्ट्रवादी
दीपक गायकवाड लोकशासन पार्टी
तानाजी सातपुते शिवसेना
नितीन सोनवणेमनसे
विशाल सोनवणे शेतकरी संघटना
तुकाराम बल्लाळ बहुजन रयत पार्टी
संतोष आवळे बहुजन शक्ती पार्टी
सी. आर. सांगलीकरअपक्ष
योगेंद्र थोरातअपक्ष
विद्यासागर कांबळेबसपा
सुरेखा शेख राष्ट्रविकास पार्टी

Web Title: Mirjayet Pancharini fought with the fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.