‘टेंभू’च्या जिवावरच आमदारक ी

By Admin | Published: February 16, 2017 11:22 PM2017-02-16T23:22:47+5:302017-02-16T23:22:47+5:30

अमरसिंह देशमुख : आटपाडी परिसरात प्रचार, अनिल बाबर यांच्यावर टीका

MLA on the death of 'Tembhu' | ‘टेंभू’च्या जिवावरच आमदारक ी

‘टेंभू’च्या जिवावरच आमदारक ी

googlenewsNext

आटपाडी : राजेंद्रअण्णा देशमुख यांनी १९९५ मध्ये राज्यमंत्रीपदाचा त्याग करून ‘टेंभू’चे ७० टक्के काम करून दाखवले. त्यानंतर विरोधकांनी चार विधानसभा टेंभूच्याच पाण्यावर लढविल्या, आमदारकीही उपभोगली. पण टेंभू मात्र आहे तिथेच राहिली, अशी टीका जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर केली. आटपाडी येथे मतदारांच्या बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले की, मी अध्यक्ष पदाच्या सव्वा वर्षाच्या काळात १०० कोटीची धनगाव पाणी योजना पूर्ण केली. काँग्रेस पक्षाचे खानापूर विधानसभा मतदार संघाचे राहुल गायकवाड व यपावाडीचे मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवा नेते अजित चव्हाण यांनी भाजप पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे समर्थक भाजप कार्यकर्ते अमोल काटकर यांनी दिघंची गटात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार सुरु केला आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अमोल काटकर यांचे स्वागत केले.
आटपाडी तालुक्यात भाजपच्या पंचायत समिती उमेदवाराच्या निवडणूक प्रचारार्थ माजी आमदार राजेंद्र देशमुख, अमरसिंह देशमुख, गोपीचंद पडळकर, बंडोपंत देशमुख, नेते व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
यावेळी अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करून उमेदवाराला आपला पाठिंबा दिला आहे. (वार्ताहर)
भाजप उमेदवाराला पाठिंबा
राजेंद्रअण्णा देशमुख यांची भेट घेऊन राहुल गायकवाड त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर यपावाडीमध्ये अजित चव्हाण यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविला. माजी जि. प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: MLA on the death of 'Tembhu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.