..मग शरद पवार ४० वर्षे झाडू मारत होते का?, गोपीचंद पडळकरांनी केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:58 PM2024-10-11T12:58:54+5:302024-10-11T12:59:30+5:30
मराठ्यांची फसवणूक कशासाठी?
ढालगाव : ‘मला महाराष्ट्राची सत्ता द्या, महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून टाकतो’, असे शरद पवार म्हणतात, मग गेली ४० वर्षे ते लोटत बसले होते काय? असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. गुरुवारी (आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ) येथे बिरोबा बनातील दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
पडळकर म्हणाले, प्रस्थापितांना गाडण्यासाठी आपण अठरापगड जातींनी आवश्यक ते सर्व केले पाहिजे. त्यासाठी प्रसंगी त्यागाचीही तयारी ठेवायला हवी. आरेवाडीच्या बिरोबाची माती जो कपाळाला लावेल, तो कोणालाही भिडू शकतो, एवढी क्षमता या मातीत आहे. धनगड व धनगर यातील फरक संपला असून, त्याबाबतचे शुद्धिपत्रक आजच काढले आहे. धनगर समाजाची मागणी मान्य करून शासनाने दसरा उत्सव साजरा करण्याची संधी आम्हा धनगर बांधवांना द्यावी. हा दसरा मेळावा भविष्यात असाच वाढत राहिला, तर आरेवाडी हे राजकारणाचे केंद्र बनेल.
प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उल्हास धायगुडे, समाधान कोळेकर, दादा लवटे, दौलत शितोळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला ब्रह्मानंद पडळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, बिरोबा देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष राहुल कोळेकर, उपाध्यक्ष समाधान कोळेकर, पोलिसपाटील रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.
मराठ्यांची फसवणूक कशासाठी?
गरीब मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले तर सर्व प्रश्न सुटतील, असा समज करून मराठ्यांची फसवणूक का करता? मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे का लावता? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.