आमदार गोपीचंद पडळकरांची ग्रा.पं. सदस्यास मारहाण; मतदान केंद्राबाहेर बाचाबाची

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 03:30 PM2023-04-30T15:30:15+5:302023-04-30T16:00:42+5:30

आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी चुरशीने मतदान सुरू आहे.

MLA Gopichand Padalkar's assaulting a member of gram panchayat; Argument outside the APMC polling station | आमदार गोपीचंद पडळकरांची ग्रा.पं. सदस्यास मारहाण; मतदान केंद्राबाहेर बाचाबाची

आमदार गोपीचंद पडळकरांची ग्रा.पं. सदस्यास मारहाण; मतदान केंद्राबाहेर बाचाबाची

googlenewsNext

आटपाडी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतदानावेळी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व काळेवाडी गावातील एका सदस्यांमध्ये झालेल्या वादावादीमध्ये आमदार पडळकर यांनी काळेवाडी  ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यास मारहाण करण्याचा प्रकार घडला. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काळजी घेणे गरजेचे होते.

आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी चुरशीने मतदान सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस, रासप यांच्यात कमालीचा संघर्ष होताना दिसत आहे. आटपाडीच्या मतदान केंद्रावर सकाळ पासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले. 

११ वाजता दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी गटातील काळेवाडी  ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांच्या कानशिलात वाजवली. त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण होते. आटपाडी बस्थानक समोरच जिल्हा परिषद शाळा नंबर 1 मध्ये मतदान केंद्र आहे. यामुळे बस्थानक मध्ये जाणाऱ्या व येणारया एस टी बसना मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत होते. 

तर मतदान केंद्राबाहेर एक ते दीड किलोमीटर पर्यत मतदारांच्या चारचाकी महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात आल्या होत्या.परिणाम मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 

Web Title: MLA Gopichand Padalkar's assaulting a member of gram panchayat; Argument outside the APMC polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.