आमदारांना जनाची नाही, मनाची तरी..!

By admin | Published: January 9, 2017 10:49 PM2017-01-09T22:49:37+5:302017-01-09T22:49:37+5:30

मानसिंगराव नाईक : शिरशीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्र्रचाराचा प्रारंभ; शिवाजीराव नाईक यांच्यावर टीका

MLAs do not know, but still ..! | आमदारांना जनाची नाही, मनाची तरी..!

आमदारांना जनाची नाही, मनाची तरी..!

Next

शिराळा : येथील लोकप्र्रतिनिधींनी अडीच वर्षात एकही मोठ्या कामाला मंजुरी आणली नाही आणि आम्ही केलेली कामे मुख्यमंत्री, इतर मंत्र्यांना आणून आपणच केल्याचा आव आणत आहेत. आपण जे काम केलेच नाही, त्या कामाचा नारळ फोडताना जनाची नाही, तर मनाची तरी बाळगायची, अशा शब्दात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यावर नाव न घेता टीका केली.
शिरशी (ता. शिराळा) येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रचार प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, अडीच वर्षात एकही ठोस विकास काम हे लोकप्रतिनिधी करू शकले नाहीत. त्यांच्या पंधरा वर्षांच्या काळातील विकास कामांपेक्षा जास्त कामे आपण पाच वर्षांत मंजूर करून आणली आहेत. माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या सहकार्याने केलेल्या विकासकामांचा प्रारंभ व उद्घाटन करीत ते सुटले आहेत. बसस्थानक, प्र्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालय, गिरजवडे प्रकल्प ही कामे आम्ही केली आहेत आणि उद्घाटन मात्र ते करीत आहेत.
ते म्हणाले की, वाकुर्डेला आता टप्प्याटप्प्याने २०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली असली तरी, हा निधी कधी मिळणार, हे त्यांनाही माहिती नाही. या लोकप्र्रतिनिधींचा नाकर्तेपणा त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही माहीत आहे. त्यामुळे त्यांना निवडून या, मंत्री करतो आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती जिंका, मग मंत्री करतो, अशा घोषणा भाजपचे नेते करीत आहेत.
यावेळी युवा नेते विराज नाईक, हरिष पाटील, विजय झिमूर, माजी जि. प. सदस्य के. डी. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, पंचायत समिती सभापती सम्राटसिंह नाईक आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोकराव पाटील, माजी पं. स. सभापती बाळासाहेब पाटील, तानाजी महिंद, दिनकर महिंद, डॉ. संपतराव पाटील, विश्वास पाटील, निवृत्ती महिंद, एम. बी. भोसले, शारदा घारगे, प्रवीण शेटे आदी उपस्थित होते. तानाजी कुंभार यांनी प्र्रास्ताविक केले. (वार्ताहर)
नेत्यांचा विश्वासघात
सह्याद्री संघाचे अध्यक्ष संपतराव देशमुख म्हणाले की, सध्याचे आमदार विश्वासघातकी आहेत. पहिल्यांदा शिवाजीराव देशमुख, नंतर फत्तेसिंगराव नाईक, आ. जयंत पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेकांचा विश्वासघात करून पदे मिळविण्याचा ते प्र्रयत्न करीत आहेत.

Web Title: MLAs do not know, but still ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.