मिरजेत लाॅकडाऊनविरुद्ध आमदारांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:27 AM2021-04-08T04:27:35+5:302021-04-08T04:27:35+5:30
अचानक लाॅकडाऊनच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मिरज शहरातील हॉटेल व्यावसायिक, छोटे व्यापारी, फेरीवाले, हातगाडी ...
अचानक लाॅकडाऊनच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मिरज शहरातील हॉटेल व्यावसायिक, छोटे व्यापारी, फेरीवाले, हातगाडी वाले, भाजी विक्रेते व व्यापारी संघटनेने आमदार सुरेश खाडे यांच्याकडे दुकाने सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळवून देण्याची मागणी केली. आमदार खाडे यांनी पोलीस, महापालिका व महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा करून व्यापाऱ्यांवरील निर्बंध हटविण्याची मागणी केली. गुरुवारी पुन्हा बैठक घेऊन सर्व व्यवहार रात्री आठपर्यंत सुरू होण्यासाठी सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून, मागणीची प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचेही खाडे यांनी सांगितले.
यावेळी भाजप व्यापार आघाडीचे गजेंद्र कुळ्ळोळी, बाबासाहेब आळतेकर, मोहन वनखंडे, ओंकार शुक्ल यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. मिरजेत व्यापारी संघटनेच्या बैठकीत गुरुवारी सकाळी अकरापर्यंत प्रशासनाने लॉकडाऊन न हटविल्यास निर्बंध झुगारून व्यापारी दुकाने सुरू करतील, असा इशारा देण्यात आला. प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देऊन दिला आहे. मिरज व्यापारी संघटनेचे विराज कोकणे, प्रसाद मदभावीकर, विवेक शेटे, अभय गोगटे, महेश बेडेकर, संजय शादीजा, ओंकार शिखरे, राहुल भोकरे, सुनील कुंभोजे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
चाैकट
याेगेंद्र थाेरात यांचाही लॉकडाऊनला विराेध
राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनीही लाॅकडाऊनला विरोध करून नियम न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी. मात्र, सरसकट दुकाने बंद करू नयेत, अशी मागणी केली आहे. दुकाने बंदमुळे कोरोना संसर्ग रोखला तरी मानसिक व आर्थिक नुकसान होणार असल्याने लाॅकडाऊनचा फेरविचार करण्याची मागणी थोरात यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.