सांगलीत रूग्णालयातून मोबाईल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:18 AM2021-06-11T04:18:50+5:302021-06-11T04:18:50+5:30
सांगली : शहरातील गुलमोहर कॉलनीतील एका रुग्णालयात घुसून चोरट्याने दोन मोबाईल लांबविले. याप्रकरणी ताविश युनुस जमादार (रा. शामराव नगर, ...
सांगली : शहरातील गुलमोहर कॉलनीतील एका रुग्णालयात घुसून चोरट्याने दोन मोबाईल लांबविले. याप्रकरणी ताविश युनुस जमादार (रा. शामराव नगर, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. गुलमोहर कॉलनीतील डॉ. वसीम मुजावर यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. दुसऱ्या मजल्यावरील नर्सिंग होममध्ये प्रवेश करून अज्ञाताने हे मोबाईल लंपास केले.
----
सांगलीतून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील नंदनवन नगर परिसरातून घरासमोर लावलेली दहा हजार रुपयांची दुचाकी चाेरट्यानी लंपास केली. याप्रकरणी संजय तात्यासाहेब घाडगे यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. शनिवार, दि. ५ जून रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
----
माधवनगरमध्ये घरात घुसून मोबाईल लांबविले
सांगली : माधवनगर येथील शुक्रवार पेठ येथील घरात घुसून अज्ञाताने दोन मोबाईल लंपास केले. याप्रकरणी श्रेयस शेखर तोरो यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. बुधवार, दि. ९ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. हॉलमधील अंथरूणावर ठेवलेले मोबाईल लंपास करण्यात आले.
----
जतमध्ये जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई
सांगली : बंदी असतानाही जुगार खेळणाऱ्यांवर जत पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी एकावर कारवाई करत रोख चार हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जत पोलिसात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----
इस्लामपूर, कवठेमहांकाळमध्ये बेकायदा दारू विक्रीवर कारवाई
सांगली: अवैधरित्या दारुची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू ठेवली आहे. त्यानुसार इस्लामपूर पोलिसांनी बुधवारी कारवाई करत देशी दारुच्या ३० बाटल्या तर रोख ५६० रुपये जप्त करत कारवाई केली तर कवठेमहांकाळ पोलिसांनीही देशी दारुच्या १५ बाटल्या जप्त केल्या आहेत.