मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतून ८१ तालुक्यांत फिरती चिकित्सा पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:21 PM2021-01-30T13:21:59+5:302021-01-30T13:22:59+5:30
wildlife Sangli- मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजने अंतर्गत राज्यातील ८१ तालुक्यांमध्ये फिरती पशुचिकित्सा पथके कार्यरत झाली आहेत. त्यापैकी ७१ तालुक्यांना चिकित्सा वाहने उपलब्ध झाली आहेत. नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण झाले.
सांगली : मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजने अंतर्गत राज्यातील ८१ तालुक्यांमध्ये फिरती पशुचिकित्सा पथके कार्यरत झाली आहेत. त्यापैकी ७१ तालुक्यांना चिकित्सा वाहने उपलब्ध झाली आहेत. नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण झाले.
शेतकर्याच्या दारात जनावरांना आरोग्य सेवा मिळावी या हेतूने ८१ तालुक्यांत फिरती पशुचिकित्सा पथके सुरु करण्यात आली आहेत. गंभीर आजारी व हालचाल करणे अशक्य असलेल्या जनावरांसाठी ही योजना फायद्याची ठरेल. अनेकदा अत्यवस्थ जनावरांना जागेवर उपचार न मिळाल्याने शेतकरी नाईलाजाने मृत्यूपंथावर सोडून देतात. आता सरकारी पशुवैद्यच जनावरापर्यंत येणार असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
पहिल्या टप्प्यात ८१ पैकी ७१ तालुक्यांना वाहने उपलब्ध झाली आहेत. लाभार्थी तालुके असे : मोखाडा, वाडा, श्रीवर्धन, माणगाव, मंडणगड, दोडामार्ग, जुन्नर, मावळ, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, वाई, कराड दक्षिण, खटाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, पलूस-कडेगाव, माढा, सांगोला, शिरोळ, कागल, पन्हाळा, हातकणंगले, करवीर, इगतपुरी, धुळे (ग्रामिण), रावेर, अक्कलकुवा, नवापूर, कर्जत, नेवासा, संगमनेर, श्रीरामपूर, सोयगाव, परभणी, घनसावंगी, जालना, वडवणी, अौसा, देवणी, लातूर ग्रामिण, देगलूर, भोकर, हदगाव, कळमनुरी, भूम, कळंब, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अमरावती, तिवसा, रिसोड, सिंदखेडराजा, मलकापूर, सावनेर, उमरेड, रामटेक, साकोली, मोहाडी, पवनी, अर्जुनी मोरगाव, सालेकसाक, एटापल्ली, कोरची, देवळी, राजुरा, सिंदेवाही, भद्रावती, मूल.