लहान मुलांमध्ये मोबाइलमधील आधीनता; चिंतेची बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:27 AM2021-05-12T04:27:53+5:302021-05-12T04:27:53+5:30
इस्लामपूर : कोरोनाकाळात लहान मुले घरीच आहेत. शिक्षणापासून मुले वंचित आहेत. त्यामुळे मुलांमध्ये अनेक वर्तने व समस्या दिसून ...
इस्लामपूर : कोरोनाकाळात लहान मुले घरीच आहेत. शिक्षणापासून मुले वंचित आहेत. त्यामुळे मुलांमध्ये अनेक वर्तने व समस्या दिसून येत आहेत. सतत अस्थिर राहणे, लहान मुलांमध्ये असलेली मोबाइल अधीनता ही जागतिक चिंतेची बाब बनली आहे. या समस्या सोडविण्यासाठी आता पालकांनीच शिक्षक बनण्याची गरज बनले असल्याचे मत ऑनलाइन झालेल्या कार्यशाळेत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले. लर्निंग सेंटरच्या संचालिका डॉ. सीमा परदेशी यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले.
या कार्यशाळेत स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठातील शिक्षणतज्ज्ञ डॉ. महेश जोशी, गोष्टीतज्ज्ञ म्हणून प्रवीण राऊत यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये गोष्टीतून शिकणे हे छोट्या मुलांसाठीच नसते, तर अगदी दहावी, बारावीच्या मुलांनाही विज्ञान, गणितसारखे अवघड विषय सोपे होतात, अशी शिक्षण पद्धती लोकप्रिय होत आहे. या कार्यशाळेत परदेशातील पालक सहभागी झाले असल्याची माहिती परदेशी यांनी दिली.