मोहित्यांचे वडगाव येथे ६0 जणांना गॅस्ट्रो, साथीचे थैमान :११ रुग्णांची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:52 PM2019-11-02T18:52:30+5:302019-11-02T18:55:10+5:30

दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांना एकापाठोपाठ उलट्या आणि जुलाब होऊ लागले. एकाचवेळी गावातील सुमारे ६० जणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना मोहित्यांचे वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व चिंचणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 Mohit's Wadgaon gastro, companion thaman: 3 patients lost their lives | मोहित्यांचे वडगाव येथे ६0 जणांना गॅस्ट्रो, साथीचे थैमान :११ रुग्णांची प्रकृती खालावली

मोहित्यांचे वडगाव येथे ६0 जणांना गॅस्ट्रो, साथीचे थैमान :११ रुग्णांची प्रकृती खालावली

Next
ठळक मुद्देमोहित्यांचे वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व चिंचणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगाव येथे जलवाहिनीला गळती लागल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे गावातील साठजणांना गॅस्ट्रोची बाधा झाली असून, ११ जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी

 

सांगली, कोल्हापूर व कºहाड येथील रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. शुक्रवारी सकाळपासून ग्रामस्थांना त्रास जाणवू लागल्यानंतर उपचारासाठी धावपळ उडाली. मोहित्यांचे वडगाव येथील ३८ ग्रॅस्ट्रोबाधित रुग्णांवर चिंचणी (वांगी) येथील ग्रामीण रुग्णालयात, तर ६ रुग्णांवर मोहित्यांचे वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. याशिवाय प्रकृती खालावल्याने ८ रुग्णांना कºहाड येथे, २ रुग्णांना सांगली येथे, तर एका रुग्णास कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

या घटनेनंतर सभापती मंदाताई करांडे यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णांची माहिती घेतली व पुढील कार्यवाहीबाबत सूचना दिल्या. अवकाळी पावसामुळे गावास पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीतून दूषित पाणीपुरवठा झाल्याने गावात ग्रॅस्ट्रोची साथ सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांना एकापाठोपाठ उलट्या आणि जुलाब होऊ लागले. एकाचवेळी गावातील सुमारे ६० जणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना मोहित्यांचे वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व चिंचणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

एकाचवेळी इतक्या रुग्णांना ग्रॅस्ट्रोची लागण झाल्याने चिंचणी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाची तारांबळ उडाली. आंतररुग्ण विभागात ३२ रुग्णांसाठी खाटांची सुविधा आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अधिकराव पाटील, डॉ. पौर्णिमा श्रृंगारपुरे, डॉ. मिलिंद मदने, डॉ. नागेश शिंदे यांनी पर्यायी व्यवस्था करून सर्व ३८ रुग्णांना दाखल करून घेत उपचार केले. प्रकृती खालावलेल्या रुग्णांना तातडीने कºहाड व सांगली येथे पाठविण्यात आले. मोहित्यांचे वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. वैशाली पाटील यांच्यावर भिस्त होती. त्यामुळे बाहेरील आरोग्य केंद्राचे डॉक्टर, तसेच सांगली येथील पथक बोलावून रुग्णांवर उपचार करण्यात आले.

आरोग्य विभागाला जाग
गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्यावर आरोग्य विभागाने मोहित्यांचे वडगाव येथील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. ग्रामपंचायतीने नळाद्वारे देण्यात येणारे पाणी केवळ खर्चासाठी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. पिण्याचे पाणी वॉटर एटीएमद्वारे मोफत ग्रामस्थांना दिले जात आहे. सांगली येथून डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक वडगाव येथे दाखल झाले आहे. गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
 

 

Web Title:  Mohit's Wadgaon gastro, companion thaman: 3 patients lost their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.