गोटखिंडीत मोकाट श्वानांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:25 AM2021-02-13T04:25:15+5:302021-02-13T04:25:15+5:30
गावात मोकाट श्वान कुठेही कळपाने फिरत असतात. श्वानांच्या पाठलागामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. या मोकाट श्वानांचा बदोबस्त व्हावा नाही, ...
गावात मोकाट श्वान कुठेही कळपाने फिरत असतात. श्वानांच्या पाठलागामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. या मोकाट श्वानांचा बदोबस्त व्हावा नाही, तर आंदोलन करणार असल्याचे निवेदन शिवसेनेने दिले आहे.
बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत एका पिसळलेल्या श्वानाने गावातील तब्बल नऊ जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. काहींनी शासकीय रुग्णालयात, तर काहींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. ही श्वान कळपाने फिरत असल्याने त्यांच्यापासून भीती आहे. ग्रामपंचायतीसमोरील रस्त्यावर टाकाऊ पदार्थ खाण्यासाठी श्वानांची रस्त्यावर सतत गर्दी असते. यामुळे ग्रामस्थांना येऊन जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दुचाकीच्या आडवी श्वान येत असल्याने अनेकदा अपघाताचे प्रकार घडले आहेत.
शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख रामचंद घारे यांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र ग्रामपंचायतीला याचे ग्रांंभीर्य नाही. ग्रामपंचायतने तातडीने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेने ग्रामपंचायतीला दिले आहे.
फोटो : १२ गाेटखिंडी २
ओळ : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील बसस्थानक परिसरात मोकाट श्वान कळपाने फिरत असतात.