अल्पवयीन मुलीची छेडछाड; एकास कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:25+5:302020-12-31T04:27:25+5:30
इस्लामपूर : एकतर्फी प्रेमाची भीती घालत अल्पवयीन मुलीस जिवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार तिची छेडछाड करून विनयभंग करणाऱ्यास ...
इस्लामपूर : एकतर्फी प्रेमाची भीती घालत अल्पवयीन मुलीस जिवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार तिची छेडछाड करून विनयभंग करणाऱ्यास येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे पहिले न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अमित विलास कदम (वय २५, रा. इस्लामपूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने ३ एप्रिल २०१८ रोजी पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलीस उपनिरीक्षक कोमल पोवार यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपी अमित कदम याच्याविरुद्ध येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी न्या. मुनघाटे यांच्यासमोर झाली. सहायक जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासले. त्यातील पीडित मुलगी, पोलीस उपनिरीक्षक कोमल पोवार यांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी सहायक फौजदार चंद्रकांत शितोळे, पोलीस संदीप शेटे यांनी खटल्याच्या कामकाजात सहकार्य केले.
चौकट
बाप फितूर.. पण मुलगी ठाम..!
या खटल्यातील आरोपी अमित कदम हा पीडित मुलीस जवळपास दोन वर्षे त्रास देत होता. या खटल्यात पीडित मुलीचा वडीलच फितूर झाला होता. मात्र, पीडित मुलीने धाडसाने आरोपीविरुद्ध साक्ष देत आपला बाणेदारपणा दाखवून दिला.
फोटो - ३०१२२०२०-आयएसएलएम- अमित कदम