कवठेमहांकाळ तालुक्यात महिनाभराचा पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:24 AM2021-04-26T04:24:59+5:302021-04-26T04:24:59+5:30
कवठेमहांकाळ : गेल्या दोन महिन्यांत उन्हाच्या दाहकतेने कवठेमहांकाळ तालुक्यातील ११ तलावातील पाणीसाठ्याचे मोठ्या प्रमाणात भाष्पीभवन झाले आहे. यामुळे कसा ...
कवठेमहांकाळ : गेल्या दोन महिन्यांत उन्हाच्या दाहकतेने कवठेमहांकाळ तालुक्यातील ११ तलावातील पाणीसाठ्याचे मोठ्या प्रमाणात भाष्पीभवन झाले आहे. यामुळे कसा बसा एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जूनमध्ये पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावणार आहे.
तालुक्यातील ११ तलावांमध्ये मध्यम स्वरूपात पाणी साठा शिल्लक राहिला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम या तलावांमधील पाणीसाठ्यावर होत आहे.
ऐन उन्हाळ्यात किमान एप्रिलपर्यंत तरी या तलावामधील पाणीसाठ्याने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पुढील मे महिन्याच्या अखेरपर्यंत कसा बसा हा पाणीसाठा पुरेल. त्यानंतर जूनमध्ये मात्र शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावणार आहे.
तालुक्यातील यावर्षीचा कडक उन्हाळा आहे. यामुळे तलाव, विहिरी, कूपनलिका याच्या पाणी साठ्यावर मोठा परिणाम झालेला आहे. मे महिन्यानंतर शेतकऱ्यांना पाणी प्रश्न भेडसावणार असल्याने आतापासूनच प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जून महिन्यात उपाययोजना करणे यामुळे सोपे होईल. येत्या १५ दिवसात पाण्याची पातळी खाली जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जून महिन्यात असणाऱ्या उन्हाळी पिकांवर, तसेच तलावामधील पाण्यावर ज्या शेतकऱ्यांनी शेती केली आहे व भाजीपाला, इतर पिके घेतली आहेत, अशा शेतकऱ्यांना जून महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे.
चाैकट
पाणीसाठा
तालुक्यातील कुची- ३८.७५ (दशलक्ष घनफूट), लंगरपेठ ३५.१०, बंडगरवाडी ३७.०२, हरोली ५.०६, बोरगाव १२.१३, घोरपडी ३७.६१, नांगोळे ७.९५, दुधेभावी ७७.८३, रायवाडी ६७.५१, बसापाचीवाडी १९५.३२, लांडगेवाडी २.५७ एवढाच मध्यम प्रमाणात तलावामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे.