कडेगावात ‘महावितरण’विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:23 AM2020-12-23T04:23:57+5:302020-12-23T04:23:57+5:30

कडेगाव येथील शेतीचा वीजपुरवठा सुरळीत नाही, लॉकडाउनच्या काळात संकटकाळातील भरमसाट वीज बिले पाठवून महावितरणने जोरदार शॉक दिला आहे. यामुळे ...

Morcha against 'Mahavitaran' in Kadegaon | कडेगावात ‘महावितरण’विरोधात मोर्चा

कडेगावात ‘महावितरण’विरोधात मोर्चा

Next

कडेगाव येथील शेतीचा वीजपुरवठा सुरळीत नाही, लॉकडाउनच्या काळात संकटकाळातील भरमसाट वीज बिले पाठवून महावितरणने जोरदार शॉक दिला आहे. यामुळे शेती व घरगुती अशा दोन्हीकडील अव्वाच्या सव्वा वीज बिलांविरोधात आंदोलक आक्रमक झाले होते.

यावेळी आंदोलकांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शशिकांत पाटील यांना घेराव घातला. प्रलंबित मागण्यांबाबत विचारणा केली. यावेळी सदर मागण्यांबाबत वरिष्ठांना कळवण्यात आले आहे; तर तालुक्यातील व शहरातील वीज समस्येबाबतच्या काही मागण्यांची दखल घेऊन कामे करण्यात आली असल्याचे शशिकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी विजय शिंदे, धनंजय देशमुख, संतोष डांगे, विजय गायकवाड, दीपक न्यायनीत, शशिकांत रासकर, जगन्नाथ नायकवडी, दिनकर जाधव, जीवन करकटे, दत्तात्रय भोसले, विठ्ठल खाडे, रघुनाथ गायकवाड, अभिमन्यू वरुडे, प्रकाश शिंदे, सिराज पटेल, खन्ना शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

फोटो-२२कडेगाव०१

फोटो : कडेगाव येथील महावितरणच्या कार्यालयावर पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी काढलेला मोर्चा.

Web Title: Morcha against 'Mahavitaran' in Kadegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.