जिल्ह्यात दरवर्षी शंभराहून अधिक जणांना कुष्ठरोग

By admin | Published: January 29, 2017 11:04 PM2017-01-29T23:04:21+5:302017-01-29T23:04:21+5:30

लहान मुलांचा समावेश : महिलांपेक्षा पुरुषांत अधिक प्रमाण; अनेक गावांमध्ये जनजागृती अभियान

More than 100 people leprosy every year in the district | जिल्ह्यात दरवर्षी शंभराहून अधिक जणांना कुष्ठरोग

जिल्ह्यात दरवर्षी शंभराहून अधिक जणांना कुष्ठरोग

Next


शीतल पाटील ल्ल सांगली
कुष्ठरोग... नुसते नाव उच्चारले तरी अनेकजण संशयाने पाहतात. या रोगाबाबत आजही समाजात अनेक गैरसमजुती आहेत. कुष्ठरुग्णांना समाजापासून दूर ठेवण्याचाच प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण हा आजार औषधोपचाराने बरा होऊ शकतो. आजही कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. सांगली जिल्ह्यात दरवर्षी शंभरहून अधिक कुष्ठरुग्ण सापडतात. त्यात लहान मुलांचाही समावेश असतो.
जिल्ह्यात दरवर्षी १०० ते १५० कुष्ठरोगी आढळून येतात, तर वर्षाला १३० ते १४० रुग्ण औषधोपचारानंतर बरे होतात. या रोगामुळे शारीरिक विकृतीचे वा विकलांगतेचे प्रमाणही जिल्ह्यात कमी आहे. वर्षाकाठी पाच ते दहा विकृतीचे रुग्ण आढळून येतात. कुष्ठरुग्णांत महिलांपेक्षा पुरूषांचे प्रमाण अधिक आहे. वर्षाला ५० ते ६४ महिला कुष्ठरोगी सापडतात, तर पुरूष रुग्ण ८० ते ९० च्या घरात आहेत. आजही समाजात या रोगाबाबत अनेक गैरसमजुती आहेत.
ही आहेत लक्षणे...
त्वचेवर खूप
दिवस दिसणारा पांढरा चट्टा
असतो.
या चट्ट्यावर स्पर्श, टोचणे, तापमान अशा संवेदना कमी होतात. त्वचा जाडसर होते. तसेच थोडी चमकदार दिसते.
असे चट्टे मुख्यत्वे चेहऱ्यावर व हातावर दिसतात. लहान मुलांमध्ये बधिरता, मुंग्या येणे अशी लक्षणे दिसतात.

Web Title: More than 100 people leprosy every year in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.