आटपाडी, बिळूर, मालगाव, वाळव्यासह ४० गावांत पन्नासपेक्षा अधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:36+5:302021-05-05T04:44:36+5:30

सांगली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आटपाडी, बिळूर, मालगाव, वाळव्यासह ४० गावांत पन्नासपेक्षा अधिक रुग्ण ...

More than fifty patients in 40 villages including Atpadi, Bilur, Malgaon, Valva | आटपाडी, बिळूर, मालगाव, वाळव्यासह ४० गावांत पन्नासपेक्षा अधिक रुग्ण

आटपाडी, बिळूर, मालगाव, वाळव्यासह ४० गावांत पन्नासपेक्षा अधिक रुग्ण

Next

सांगली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आटपाडी, बिळूर, मालगाव, वाळव्यासह ४० गावांत पन्नासपेक्षा अधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी गावपातळीवर दक्षता समित्यांनी अधिक सक्रिय होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे उपस्थित होते.

ते म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या जास्त असल्यास दक्षता समित्यांनी कंटेन्मेंट झोन तयार करावेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच त्याच्या जवळच्या संपर्कातील लोकांचा तत्काळ शोध घ्यावा. त्यांचेही घरगुती विलगीकरण करावे. घरगुती विलगीकरणाचे उल्लंघन करणाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास किंवा घरगुती विलगीकरणाचे उल्लंघन केल्याचे दिसल्यास गुन्हे दाखल करावेत.

डुडी म्हणाले की, गाव कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता समित्यांनी कठोर निर्णय घ्यावेत. बाहेरून येणाऱ्यांची तपासणी करावी. विलगीकरण, कंटेन्मेंट झोनमध्ये होम डिलिव्हरी आदी कामे समित्यांनी करावीत. येणारे आठ-दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. बेड, व्हेंटिलेटर वाढीवर मर्यादा आहेत. संकटावर मात करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडण्याशिवाय पर्याय नाही. ४३ डेडिकेटेड कोविड रुग्णालयांत १ हजार ९१५ रुग्ण, कोविड केअर सेंटरमध्ये २७२ रुग्ण उपचाराखाली आहेत. २९ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटमध्ये ७९३ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणामध्ये १० हजार ७७० रुग्ण आहेत.

चौकट

५० पेक्षा जास्त रुग्ण असणारी गावे अशी :

आटपाडी – आटपाडी ७८८, दिघंची १८५, शेटफळे १०१, निंबवडे ८३. जत - शेगाव ८२, कुनीकुन्नूर ७७, माडग्याळ ६१, बिळूर १३१, डफळापूर ७२, जत ३५६. तासगाव - चिंचणी ५६, मणेराजुरी ८६, कुमठे ७०, बोरगाव ६८, राजापूर ८८, तासगाव १६५. मिरज - आरग १६०, बेडग १५६, कवठेपिरान ५३, माधवनगर ५५, मालगाव ७१, म्हैशाळ ८०. वाळवा - वाळवा १०१, बोरगाव ७०, साखराळे ५०, कामेरी ६६. पलूस – पलूस १८१, कुंडल ८०. कडेगाव - वांगी ५९, कडेगाव ९९, येतगाव ५४. खानापूर - खानापूर ७३, बलवडी ५१, पळशी ६२, लेंगरे ६२. कवठेमहांकाळ - कवठेमहांकाळ ८७, नागज ७०. शिराळा – शिराळा ६८, मणदूर ५२.

Web Title: More than fifty patients in 40 villages including Atpadi, Bilur, Malgaon, Valva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.