जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:55+5:302021-04-20T04:28:55+5:30
सांगली : जिल्ह्यात आजअखेर सुमारे ४ लाख २० हजार नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले. ३७७ लसीकरण केंद्रांवर २३०० ...
सांगली : जिल्ह्यात आजअखेर सुमारे ४ लाख २० हजार नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले. ३७७ लसीकरण केंद्रांवर २३०० आरोग्य कर्मचारी लसीकरण मोहिमेत गुंतले आहेत. सोमवारी २१ हजार लोकांना लस देण्यात आली.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता तसेच स्वयंसेवक कार्यरत आहेत. आजअखेर ४ लाख १९ हजार ९४४ जणांचे लसीकरण झाले आहे. दररोज सरासरी १९ ते २० हजार लसीकरण होत आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभरात २१ हजार जणांना लस देण्यात आली. रविवारी जिल्ह्याला ३१ हजार डोस मिळाल्याने सोमवारी दिवसभर ३७७ केंद्रांवर पूर्ण क्षमतेने लसीकरण सुरू राहिले. अद्याप सुमारे नऊ हजार डोस शिल्लक आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत ते संपण्याची शक्यता आहे. तोपर्यंत आणखी डोस येतील, असे लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, लसीकरणाचा दुसरा डोस सुुरू झाल्याने महापालिका क्षेत्रातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रांवर दिवसभर गर्दी होती. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही रांगा पहायला मिळाल्या.