जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:25+5:302021-07-14T04:30:25+5:30
सांगली : मागील आठवड्यात जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर १० टक्क्यांवर गेल्यामुळे नव्याने निर्बंध लागू केले आहेत. रस्त्याकडेला हातगाड्यांवर खाद्यपदार्थ ...
सांगली : मागील आठवड्यात जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर १० टक्क्यांवर गेल्यामुळे नव्याने निर्बंध लागू केले आहेत. रस्त्याकडेला हातगाड्यांवर खाद्यपदार्थ आणि भाजी विक्री बंद असेल. सर्व आठवडी बाजार पूर्णत: बंद राहतील. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी आदेश दिले.
शासनाने फक्त आरटीपीसीआर चाचण्यांनुसार पॉझिटिव्हीटी दर निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी अलीकडील दोन आठवड्यांतील दर गृहीत धरला जाणार आहे, त्यामुळे जिल्ह्यात चौथ्या स्तराच्या निर्बंध बुधवारपासून सुरू होतील. १९ जुलैच्या पहाटे पाचपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत निर्बंध अधिक कडक करण्याची सूचना दिली होती, त्यानुसार नवे आदेश जारी करण्यात आले.
चौकट
हे बंद राहील
- रस्त्याकडेची खाद्यपदार्थ व भाजी विक्री
- रस्ते, फुटपाथवरील कोणतीही साहित्य व पदार्थ विक्री
- शहरी व ग्रामीण आठवडा बाजार
- सार्वजनिक ठिकाणे, माॅर्निंग वॉक, मैदानांवर चालणे, सायकल चालविणे, मैदानी खेळ
चौकट
याला परवानगी
- अधिकृत भाजी मंडई सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत
- भाजीपाला व फळ विक्रेत्यांना अधिकृत मंडईतच परवानगी
- घरपोहोच भाजी व फळ विक्रीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करावे
- अत्यावश्यक सेवेतील वस्तू घरपोहोच द्याव्यात
- एका मंगल कार्यालयात एकच लग्न, दोन तासांसाठी २५ जणांनाच परवानगी, अन्यथा कुटुंबास ५० हजार रुपये दंड
- लग्नाची माहिती कार्यालय मालकांनी पोलीस व प्रशासनाला देणे आवश्यक
- अत्यावश्यक सेवेतील दुकानांत नियम भंगाला ५०० रुपये दंड, वारंवार भंग केल्यास दुकान बंदची कारवाई
- अंत्यसंस्कारासाठी २० जणांना परवानगी