आरआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली मोटार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2016 01:06 AM2016-02-10T01:06:52+5:302016-02-10T01:08:30+5:30
पाच लाखांचा खर्च : विद्यार्थ्यांनी दिले अडीच लाख, मध्यप्रदेश येथील स्पर्धेत सहभागी होणार
इस्लामपूर : येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या २५ विद्यार्थ्यांनी ह्यचारचाकी मोटारगाडीह्ण तयार केली आहे. ही गाडी इंदोर येथील देशपातळीवरील स्पर्धेत सहभागी होणार आहे. ११० अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मोटार गाड्यांची स्पर्धा होणार आहे.
माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देत स्वत: आरआयटीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गाडीचे कौतुक केले व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.
आ़ पाटील यांनी मंगळवारी दुपारी आरआयटीला भेट देऊन ह्यगॅलॅक्टस रेसिंगह्ण या ग्रुपने तयार केलेल्या गाडीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी गाडीची रचना, इंजिन क्षमता, पल्ला गाठण्याची क्षमता, सुरक्षितता आदी प्रश्न विचारत गाडीची सविस्तर माहिती घेतली़ याप्रसंगी कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आऱ डी़ सावंत, संचालिका प्रा़ डॉ़ सुषमा कुलकर्णी, प्रा़ एल़ एम. जुगूळकर, प्रा़ एस़ आऱ पाटील उपस्थित होते़
बी़ टेक.च्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या वर्षात शिकणाऱ्या २५ विद्यार्थ्यांनी ही गाडी बनविली आहे़ अभियांत्रिकीमधील प्रत्यक्ष ज्ञान वाढविण्याचा हा एक भाग आहे़ प्रफुल्ल पोटफोडे,आदित्य पंढरपुरे, हंसराज पाटील, ओंकार ओंबाळे, विशाल धुळासावंत, महेश शिंगाडे, प्रतीक बनसोडे, ओम पाटील यांनी आपले सहकारी व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ही नवनिर्मिती केली आहे.
ही गाडी तयार करण्यास पाच लाख रुपये खर्च आला असून, विद्यार्थ्यांनी स्वत: २ लाख ६० हजाराचे योगदान दिले आहे़ आ़ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू कारखान्याने विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी एक लाख रुपयांचे प्रायोजकत्व घेतले. तसेच राजारामबापू बँक, विराज इंडस्ट्रीज (शिराळा), अॅक्युरेटस इंडस्ट्रीज (कोल्हापूर), नोवस नॅक्सेस (पुणे), आकलन (पुणे), बॉम्बे रेआॅन (पेठ), सम्राट मोटर्स (सातारा), यशोधन फौडेशन (इस्लामपूर) यांनीही आर्थिक सहकार्य केले आहे.