डोंगरी साहित्य संमेलनाचे पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:21 AM2020-12-07T04:21:26+5:302020-12-07T04:21:26+5:30
कोकरुड : पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळाच्या डोंगरी साहित्य संमेलन पुरस्कारांची घोषणा ‘शब्दरंग’ व ...
कोकरुड : पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळाच्या डोंगरी साहित्य संमेलन पुरस्कारांची घोषणा ‘शब्दरंग’ व डोंगरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी वसंत यांनी रविवारी केली.
२०१९ मधील उत्कृष्ट कादंबरी म्हणून उद्याेजक बळीराम पाटील-चरणकर साहित्य पुरस्कारासाठी लेखक सुरेश पाटील यांच्या ‘नक्षलबारी’ या बहुचर्चित कादंबरीची निवड झाली आहे. कथा, कविता व आत्मचरित्र या विभागात डोंबिवली (जि. ठाणे) येथील कवयित्री विशाखा विशाखा यांच्या ‘तुमुल आंतरीचे’ या कवितासंग्रहाची उत्कृष्ट कवितासंग्रह म्हणून उद्याेजक बाजीराव देसाई काळुंद्रेकर साहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून जानेवारी २०२१ मध्ये होणाऱ्या डोंगरी साहित्य संमेलनात मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार वितरण होईल. कोरोना संकटामुळे संमेलनाची तारीख पुढे जाऊ शकते, अशी माहिती कवी वसंत पाटील यांनी दिली आहे.
फोट-१) 06suresh patil
२)06vishakha