चव्हाणवाडी येथील डोंगरास भेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:28 AM2021-07-30T04:28:34+5:302021-07-30T04:28:34+5:30
2. कोकरूड, ता. शिराळा येथे छोटा बंधारा बुजवून त्या ठिकाणी करण्यात आलेला खडीचा साठा दिसत आहे. लोकमत न्यूज नेटवर्क ...
2. कोकरूड, ता. शिराळा येथे छोटा बंधारा बुजवून त्या ठिकाणी करण्यात आलेला खडीचा साठा दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : चव्हाणवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील डोंगरास अंदाजे दोनशे फूट लांबीची भेग पडल्याने गावाला धोका निर्माण झाला आहे.
शेडगेवाडी ते कराड राज्य महामार्गालगत आणि डोंगराच्या पायथ्याशी दीडशे घरांची चव्हाणवाडी ही वस्ती आहे. वाडीच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी अनेक वर्षांपासून खडी क्रशर सुरू आहे. या ठिकाणी खोदकामही मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. सध्या कार्यरत असलेल्या क्रशरच्या मालकाने जवळील छोटा बंधारा खडीच्या साठ्यासाठी बुजवला असून या ठिकाणी खडीचे ढीग ठेवले आहेत. त्यातच अनेक वर्षांपासून या ठिकाणी मोठमोठे स्फोट करण्यात येत आहेत. त्यामुळे डोंगर ठिसूळ बनला आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे खड्या असणाऱ्या डोंगरास दोनशे फूट लांबीची व दोन फूट खोलीची भेग पडली. या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व शिराळा तहसीलदार यांना पाठविले आहे.