एलबीटी विरोधात दिवाळीनंतर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:52 PM2017-10-06T15:52:08+5:302017-10-06T15:52:08+5:30
सांगली शहरातील व्यापाºयांना एलबीटीपोटी नोटिसा बजाविण्याचे काम सुरूच ठेवले आहे. वास्तविक महापौर हारूण शिकलगार यांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. तरीही प्रशासनाकडून व्यापाºयांवर कारवाई सुरूच आहे. याविरोधात दिवाळीनंतर व्यापारी, उद्योजकांची एकत्रित बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी सांगितले.
सांगली, दि. ६ : महापालिकेने शहरातील व्यापाºयांना एलबीटीपोटी नोटिसा बजाविण्याचे काम सुरूच ठेवले आहे. वास्तविक महापौर हारूण शिकलगार यांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. तरीही प्रशासनाकडून व्यापाºयांवर कारवाई सुरूच आहे. याविरोधात दिवाळीनंतर व्यापारी, उद्योजकांची एकत्रित बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी सांगितले.
शहा म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात महापौर, उपमहापौर, आयुक्तांना व्यापाºयांचे शिष्टमंडळ भेटून, नोटिसा व कारवाई थांबवावी, दिवाळीनंतर एकत्रित बसून तोडगा काढण्याची हमी दिली होती. त्यानुसार महापौरांनीही ही बाब मान्य करून व्यापाºयांना नोटिसा न देण्याचे आश्वासन दिले होते.
नवरात्रीपासून दिवाळी संपेपर्यंत नोटीस वाटप करायचे नाही, असे ठरले असतानाही, पुन्हा प्रशासनाकडून व्यापाºयांना नोटिसा बजाविल्या जात आहेत. त्यामुळे प्रशासनाला हा प्रश्न सोडवायचा नाही, असेच दिसते.
दुसरीकडे एलबीटी अधीक्षकांनी व्यापारी संघटनेवर आरोप केले आहेत. व्यापारी नोटीस घेऊन असेसमेंट करण्यात तयार आहेत, पण संघटना त्यावर आक्षेप घेते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी आता असेसमेंट करूनच दाखवाव्यात, असे आव्हानही शहा यांनी दिले. दिवाळीनंतर तिन्ही शहरांतील व्यापारी व उद्योजकांची व्यापक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.