आपच्या वतीने गॅसदरवाढीविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:46+5:302021-07-14T04:30:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : गॅस दरवाढीविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने मिरजेत आक्रोश आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : गॅस दरवाढीविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने मिरजेत आक्रोश आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात कार्यकर्त्यांनी यावेळी निदर्शने केली.
येथील महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा यूथ विंग अध्यक्ष सागर भोसले म्हणाले की, वाढत्या पेट्रोल, डिझेल दरासह घरगुती गॅस सिलिंडरचे दर तब्बल ८२५ रुपये झाले आहेत. महामारीच्या व महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेवर हा मोठा आघात झाला आहे. ज्या मुद्यावर केंद्र सरकार सत्तेवर आले व आपल्या फसव्या जाहीरनाम्यात महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले, त्यास आता हरताळ फासण्यात आला आहे. हे सरकार म्हणजे केवळ मोठ्या व्यापाऱ्यांसाठीच ‘अच्छे दिन’ दाखवत आहे. या जुलमी सरकाराला जाब विचारण्यासाठी आम आदमी पक्ष रस्त्यावर उतरून प्रतिकार करेल.
आंदोलनात मिरज तालुकाध्यक्ष आरीफ मुल्ला, उपाध्यक्ष फय्याज सय्यद, विनोद मोरे, शहराध्यक्ष जोहेब मुल्ला, रवी बनसोडे, श्रीकांत चंदनवाले, संदीप कांबळे, संभाजी मोरे, तौफिक हवालदार, निसार मुल्ला, मनीषा माने आदींनी सहभाग नोंदवला.