सांगलीत मंदिरे सुरु करण्यासाठी आधात्मिक आघाडीच्यावतीने आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 02:51 PM2020-11-10T14:51:06+5:302020-11-10T14:54:02+5:30

Temple, Religious Places, Morcha, Sangli, collectoroffice राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सर्व मंदिरे व प्रार्थना स्थळे सुरु करावीत, या मागणीसाठी अध्यात्मिक आघाडीच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

Movement on behalf of the spiritual front to start temples in Sangli | सांगलीत मंदिरे सुरु करण्यासाठी आधात्मिक आघाडीच्यावतीने आंदोलन

सांगलीत मंदिरे सुरु करण्यासाठी आधात्मिक आघाडीच्यावतीने आंदोलन

Next
ठळक मुद्देसांगलीत मंदिरे सुरु करण्यासाठी आधात्मिक आघाडीच्यावतीने आंदोलन देवस्थानाचे सेवेकरी, कर्मचारी वर्गावर गेल्या ८ महिन्यांपासून उपासमारीची वेळ

सांगली : राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सर्व मंदिरे व प्रार्थना स्थळे सुरु करावीत, या मागणीसाठी अध्यात्मिक आघाडीच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, देशातील इतर राज्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये अद्यापही धार्मिक स्थळे बंद आहेत.

त्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणारे पूजा-साहित्य विक्रेते, हारफुले-प्रसाद विक्रेते, देवस्थानाचे सेवेकरी, कर्मचारी वर्गावर गेल्या ८ महिन्यांपासून उपासमारीची वेळ आलेली आहे.  लोकांची आर्थिक चक्रे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. दिवाळीच्या आत सर्व धार्मिक स्थळे सुरु करावीत अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

आंदोलनावेळी आध्यत्मिक सेलचे अध्यक्ष अजयकुमार वाले, निशिकांत शेटे महाराज, माजी आमदार नितीन शिंदे, कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेवक सुब्राव मद्रासी, मोहन जामदार, सलीम पन्हाळकर, अशोक पवार, गौस पठाण, ज्ञानेश्वर पोतदार, वैशाली पाटील, शैलजा कोळी, प्रियानंद कांबळे, रवींद्र ताम्हनकर, जगदीश खाडिलकर, अजित ठोंबरे, अनिकेत पिसे, सदाशिव गुरव, अनंत गुरव, उत्तम ठोंबरे, शशिकांत गुरव आदी उपस्थित होते.

Web Title: Movement on behalf of the spiritual front to start temples in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.