परप्रांतीय कुंभारांची चलती, सांगलीतील कुंभार व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 03:44 PM2021-03-27T15:44:19+5:302021-03-27T15:49:41+5:30

business Sangli-कोरोना आणि परप्रांतीय विक्रेत्यामुळे सांगलीतील कुंभार व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ऐन उन्हाळ्यामध्ये माठ विक्रेते अडचणीत आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

The movement of foreign potters, the potter business in Sangli is in trouble | परप्रांतीय कुंभारांची चलती, सांगलीतील कुंभार व्यावसायिक अडचणीत

परप्रांतीय कुंभारांची चलती, सांगलीतील कुंभार व्यावसायिक अडचणीत

Next
ठळक मुद्देपरप्रांतीय कुंभारांची चलतीसांगलीतील कुंभार व्यावसायिक अडचणीत

सुरेंद्र दुपटे

संजयनगर/सांगली : कोरोना आणि परप्रांतीय विक्रेत्यामुळे सांगलीतील कुंभार व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ऐन उन्हाळ्यामध्ये माठ विक्रेते अडचणीत आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

सांगली शहरांमध्ये आता उन्हाळ्यात राजस्थान, गुजरात येथून आलेल्या परप्रांतीय विक्रेते स्वस्त दराने माठ विक्री करतात, त्यामुळे सांगलीतील स्थानिक कुंभार समाजातील विक्रेते अडचणीत सापडले आहेत. परप्रांतीयांकडून तुलनेने स्वस्त माठ मिळू लागल्याने ग्राहकांनी सांगलीतील स्थानिक कुंभार समाजाकडे पाठ फिरवल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

सांगलीतील गणपती पेठेच्या पाठीमागे कुंभार समाजाचे अनेक कारागीर माठ विक्रीचा व्यवसाय करतात परंतु सांगलीमध्ये आता राजस्थान आणि गुजरात मधील विक्रेते मार्ट विक्री आल्यामुळे स्थानिक त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महापूर आणि कोरोनामुळे आधीच व्यवसाय चालत नसल्यामुळे कसेबसे जीवन जगणाऱ्या कुंभार समाजाला आता परप्रांतीयांच्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: The movement of foreign potters, the potter business in Sangli is in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.