आरपीआयचे जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:02+5:302021-09-10T04:32:02+5:30

जत : उपविभागीय अधिकारी जत यांच्या कार्यालयातील जनतेशी उद्धट वर्तन करणाऱ्या सुनील कवठेकर या कर्मचाऱ्याची त्वरित बदली करावी व ...

Movement in front of RPI's Jat Prantadhikari's office | आरपीआयचे जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

आरपीआयचे जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Next

जत : उपविभागीय अधिकारी जत यांच्या कार्यालयातील जनतेशी उद्धट वर्तन करणाऱ्या सुनील कवठेकर या कर्मचाऱ्याची त्वरित बदली करावी व तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त जागेवर अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या कराव्यात, यांसह विविध मागण्यांसाठी आर.पी.आय.तर्फे गुरुवारी जतमध्ये आंदोलन केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे व उपाध्यक्ष विकास साबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. जत येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केले. या आंदोलनात वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष मोहसीन इनामदार, आर.पी.आय.जत तालुका (पूर्व) अध्यक्ष संजय कांबळे, प्रा.अभिजित आठवले, महाविर मड्डीमनी, रूपसेन उमराणी, राहुल वाघमारे, शिकंदर पटाईत, विवेकानंद स्वामी, संतोष सनदी, बापू खांडेकर, शहाजी ऐवळे, म्हाळाप्पा ऐवाळे, सुनील गोळे, अरुण सनदी आदी सहभागी झाले होते.

जत तालुक्यातील खासगी सावकारी, मटका, चक्रीजुगार बेकायदेशीर व्यवसाय ताबडतोब बंद झाले पाहिजेत. त्याचप्रमाणे डाॅ. रवींद्र आरळी काॅर्नर ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून त्याची चौकशी झाली पाहिजे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले. जतचे उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यानी निवेदन स्वीकारले.

090921\img-20210909-wa0030.jpg

आरपीआयचे जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

प्रांताधिकारी आवटे यांना निवेदन देताना

Web Title: Movement in front of RPI's Jat Prantadhikari's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.