ऊस दरासाठी साखरसम्राटांनीच आंदोलन करावे : सदाभाऊ खोत

By admin | Published: November 7, 2014 11:04 PM2014-11-07T23:04:57+5:302014-11-07T23:35:00+5:30

पाटील हे साखरसम्राटांचे नेते असल्याचे मानतात. त्यांनी स्वत:च्या कारखान्याचा दर ३ हजार रुपये जाहीर करुन स्वत:चे नाव गिनीज बुकात नोंदवावे,

Movement of sugarcane for sugarcane prices: Sadabhau Khot | ऊस दरासाठी साखरसम्राटांनीच आंदोलन करावे : सदाभाऊ खोत

ऊस दरासाठी साखरसम्राटांनीच आंदोलन करावे : सदाभाऊ खोत

Next

अशोक पाटील - इस्लामपूर --गेली १५ वर्षे आमचे नेते राजू शेट्टी आणि मी ऊस दरासाठी आंदोलन करत आहे. गत आंदोलन जयंत पाटील यांनी चिघळविण्याचा प्रयत्न केला. याचा फटका लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आघाडी काँग्रेसला बसला आहे. शाहू कारखान्याने २५३0 रुपये दर जाहीर केला आहे. जयंत पाटील हे साखरसम्राटांचे नेते असल्याचे मानतात. त्यांनी स्वत:च्या कारखान्याचा दर ३ हजार रुपये जाहीर करुन स्वत:चे नाव गिनीज बुकात नोंदवावे, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला. याचवेळी त्यांनी, साखरसम्राटांनी ऊस दरासाठी आंदोलन केल्यास ते जगातील आश्चर्य ठरेल, असा टोलाही ‘लोकमत’शी बोलताना मारला.
खोत म्हणाले की, खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस, कांदा, हळद अशा नगदी पिकांना दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलने केली. यामुळेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला केंद्रात व राज्यात चांगले दिवस आले आहेत. यामुळेच संघटनेतील काही मतलबी नेते संघटना फुटणार, अशी हवा उठवत आहेत. ज्यावेळी राजू शेट्टींपासून सदाभाऊ खोत दुरावतील, तेव्हाच संघटना फुटेल हे त्यांनी लक्षात ठेवावे.
साखरसम्राटांनी आमचा आदर्श घेतला आहे. त्यांना आता लक्षात आले आहे की, ऊस उत्पादकाला दर मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच जयंत पाटील गत आंदोलनापासून उसाला ३ हजार रुपये दर देण्याची भाषा करीत आहेत. जयंत पाटील यांनी परवाच बहे येथे झालेल्या एका कार्यक्रमात, आंदोलन हे कोणाच्या विरोधी नसते. उसाला दर मिळायलाच हवा. ही लोकभावना आहे. त्याचा आदर करा, असे वक्तव्य केले होते. हे आम्ही केलेल्या आंदोलनाचे फलितच म्हणावे लागेल.
उसाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरावे लागत होते. आता साखरसम्राटांनी ऊस दरासाठी आंदोलन केल्यास कोणाचेही नुकसान होणार नाही. ऊस कामगार व यंत्रणा साखरसम्राटांच्या अधिपत्याखाली असल्याने, हे आंदोलन यशस्वी होऊन उसाला ३ हजार रुपये दर मिळेल. हेच आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यश मानतो, असेही खोत यांनी यावेळी स्पष्ट केले. (वार्ताहर)

आक्रमक आंदोलन हवे
सदाभाऊ खोत म्हणाले की, रघुनाथ पाटील लोकसभा निवडणुकीपासून कोठे होते कोणालाच माहिती नव्हते. आम आदमी पक्षाचा नाद सोडून गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा उगवले आहेत. शेतकऱ्यांच्या ऊस दरप्रश्नी त्यांची कोल्हेकुई सुरु झाली असून त्यांनी गर्दी गोळा करण्यासाठी राज ठाकरेंचा आसरा घेतला आहे. फक्त गर्दी खेचून ऊस दर मिळत नाही, त्यासाठी रस्त्यावर येऊन आक्रमक आंदोलन करून रक्त सांडावे लागते, हे दादांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

Web Title: Movement of sugarcane for sugarcane prices: Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.