Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कमळच फुलणार, पालकमंत्री सुरेश खाडेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 04:57 PM2024-01-04T16:57:38+5:302024-01-04T17:01:23+5:30

'भाजपाचे व्हिजन व विचार घेऊन काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला देशाचे भविष्य घडवायचे आहे'

MP Sanjay Patil will do a hat trick while Prabhakar Patil is the next MLA in Tasgaon-Kavthemahankal assembly constituency says Guardian Minister Suresh Khade | Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कमळच फुलणार, पालकमंत्री सुरेश खाडेंचा विश्वास

Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कमळच फुलणार, पालकमंत्री सुरेश खाडेंचा विश्वास

तासगाव : सांगलीलोकसभा मतदारसंघातून खासदार संजय पाटील हे हॅटट्रिक करणार हे निश्चित आहेच; पण तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातही कमळ फुलणार आहे. येथे प्रभाकर पाटील हेच पुढचे आमदार असतील, असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील भाजपच्या नवनिर्वाचित पदाधिकारी, नूतन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, तसेच संजय गांधी योजनेचे अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार तासगाव येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, दीपक शिंदे उपस्थित होते. पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, भाजपाचे व्हिजन व विचार घेऊन काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला देशाचे भविष्य घडवायचे आहे. आपल्या राष्ट्राची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करण्याचे काम २०१४ ला सुरू झाले. आज संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या देशातील विकसित शहरांकडे व योजनांकडे आहे.

संजय पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. पुढील काळात पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी. या कामात पदाधिकारी लागेल ती मदत करतील अशा सूचना केल्या.

प्रभाकर पाटील म्हणाले, मतदारसंघातील सर्वांगीण विकासाबरोबर उद्योग व्यवसाय, दळण वळण, पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. आपण सर्वजण भाजपाचा विचार घेऊन काम करत आहात याचा अभिमान आहे.

Web Title: MP Sanjay Patil will do a hat trick while Prabhakar Patil is the next MLA in Tasgaon-Kavthemahankal assembly constituency says Guardian Minister Suresh Khade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.