आता भाजप शरद पवारांना धक्का देणार? विनोद तावडेंनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 07:24 PM2024-08-28T19:24:53+5:302024-08-28T19:33:40+5:30
Vinod Tawde Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. भाजपा नेते विनोद तावडे आज सांगली दौऱ्यावर होते.
Vinod Tawde Sharad Pawar ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून भाजपा नेते विनोद तावडे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील शरद पवार ( Sharad Pawar ) गटातील नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
“...तर शरद पवार ४ ते ५ वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
काही दिवसापूर्वी कोल्हापूरातील भाजपा नेते समरजीतसिंह घाटगे यांनी भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शरद पवार भाजपाला आणखी एक धक्का बसणार देणार असल्याचे बोलले जात आहे. इंदापुरचे बाजपा नेते हर्षवर्धन पाटील, अहमदनगरचे भाजपा नेते विवेक कोल्हे हेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता शरद पवार गटातील नेताही भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
विनोद तावडेंनी बड्या नेत्याची भेट घेतली
आज सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला भाजपा नेते विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मेळावा संपल्यानंतर शरद पवार गटाचे नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड राजकीय चर्चा चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार नाईक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत. याआधीही नाईक भाजपामध्येच होते, पण महाविकास आघाडी सरकार काळात त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तावडेंच्या भेटीनंतर नाईक आता पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
शिराळा मतदारसंघातील समीकरण काय?
शिराळा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक आहेत. याआधी शिवाजीराव नाईक यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता. पण, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाईक यांचा पराभव झाला. दरम्यान, आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून सम्राट महाडिक यांचे नाव चर्चेत आहे. महाडिक यांनी यावेळी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षापासून आमदारकीसाठी तयारी केली आहे. तर, दुसरीकडे भाजपा (BJP) नेते सत्यजित देशमुख यांचीही ताकद या मतदारसंघात मोठी आहे, यामुळे भाजपा यावेळी नेत्यांची मोट बांधून पुन्हा एकदा शिराळा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले की, शरद पवारांना निवडणुका जिंकण्याचे व्याकरण कळले, पण... #SharadPawarhttps://t.co/4JCANq3cLi
— Lokmat (@lokmat) August 28, 2024