आटपाडीतील बहुचर्चित १६ लाखांच्या बकऱ्याची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:19 AM2020-12-27T04:19:34+5:302020-12-27T04:19:34+5:30

सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबूराव मेटकरी यांचा मोदी नावाचा बकरा आटपाडीच्या जनावरांच्या बाजारात चांगलाच चर्चेत आला हाेता. मेटकरी यांनी ...

The much talked about 16 lakh goat theft in Atpadi | आटपाडीतील बहुचर्चित १६ लाखांच्या बकऱ्याची चाेरी

आटपाडीतील बहुचर्चित १६ लाखांच्या बकऱ्याची चाेरी

Next

सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबूराव मेटकरी यांचा मोदी नावाचा बकरा आटपाडीच्या जनावरांच्या बाजारात चांगलाच चर्चेत आला हाेता. मेटकरी यांनी त्याची किंमत दीड कोटी रुपये लावली हाेती. त्याला आटपाडीच्या बाजारात त्याला ७० लाख रुपये देण्याची तयारी काहींनी दर्शविली हाेती. पण मेटकरी यांनी त्यास नकार दिला. याच दीड कोटी किमतीच्या माेदी बकऱ्याचे बीज असलेला अवघ्या सहा महिन्यांचा बकरा तब्बल १६ लाख रुपये देऊन आटपाडीतील सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला. उच्चांकी दरामुळे मोदी बकरा आणि त्याचे पिलू हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात प्रसिद्ध झाले हाेते. सोमनाथ जाधव यांनी खरेदी केलेला १६ लाख रुपयांचा बकरा शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्यासुमारास आलिशान माेटारीतून अज्ञातांनी चाेरुन नेला. या घटनेने आटपाडी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सरपंच वृषाली पाटील व ॲड. धनंजय पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मरगळे, बाळासाहेब मेटकरी, सुखदेव पाटील, मनोज देशपांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आटपाडी पोलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व अजित पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी केली.

फाेटाे : १६ आटपाडी १

ओळ : आटपाडीच्या बाजारात चर्चेत आलेला १६ लाख रुपये किमतीचा बकरा अज्ञातांनी चाेरुन नेला.

Web Title: The much talked about 16 lakh goat theft in Atpadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.