महापालिकेकडून बालकांचे पीसीव्ही लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:13+5:302021-07-17T04:22:13+5:30
सांगली : न्यूमोकोकल न्यूमोनिया आणि मेनिन जायटीसपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी महापालिकेकडून न्यूमोकोकल काँन्युगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) लसीकरणाला सुरूवात करण्यात ...
सांगली : न्यूमोकोकल न्यूमोनिया आणि मेनिन जायटीसपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी महापालिकेकडून न्यूमोकोकल काँन्युगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर ही लस विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक वर्षाच्या आतील बालकांना ही लस बुस्टर म्हणून दिली जाणार आहे. जामवाडी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, नोडल ऑफिसर डॉ. वैभव पाटील, डॉ. माधुरी पाटील, डॉ. वर्षा पाटील यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला.
---------
महापालिकेकडून धूर फवारणी
सांगली : महापालिकेच्या प्रभाग आठमधील तुळजाईनगर, लक्ष्मीनगर, पार्श्वनाथनगर, शारदा हाऊसिंग सोसायटी, शारदानगर, महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी, विवेकानंद सोसायटी आदी परिसरात धूर फवारणी करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात औषध व धूर फवारणी मोहीम हाती घेतली आहे.
----------
मोकाट जनावरांचा त्रास
सांगली : शहरातील गणपती पेठ, मारुती रोड परिसरात मोकाट जनावरांचा त्रास वाहनधारकांना होत आहे. नागरिकांकडून जनावरे मोकाट सोडली जात आहेत. महापालिकेच्या कचरा कंटेनरजवळ जनावरांच्या झुंडी उभ्या असतात. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.