महापालिकेकडून खासगी बोटींना इंधन पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:25 AM2021-07-26T04:25:34+5:302021-07-26T04:25:34+5:30
------ महापुराच्या काळात पार्सल सेवा सुरू सांगली : शहराला महापुराचा मोठा फटका बसला आहे. हजारो नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले ...
------
महापुराच्या काळात पार्सल सेवा सुरू
सांगली : शहराला महापुराचा मोठा फटका बसला आहे. हजारो नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. कोरोनामुळे दुपारी चार वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू होत्या. पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा व हॉटेलमधून जेवणाची पार्सल सेवा सुरू ठेवण्यास सवलत देण्यात आल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
--------
निवारा केंद्रासमोर चिखल
सांगली : प्रभाग १९ मधील महापालिकेच्या शाळा नंबर ७ मध्ये पूरग्रस्त लोकांसाठी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. महापालिकेने शाळेच्या भोवती साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा केला. पण आता शाळेकडे जाणारा मार्ग चिखलमय बनला आहे. महापालिकेने फिरत्या शौचालयाची सोय केली नाही. तरी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सुविधा द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका सविता मदने यांनी केली.
-----------
शहरात बघ्यांची गर्दी कायम
सांगली : महापूर पाहण्यासाठी शहरात बघ्यांची गर्दी रविवारीही कायम होती. पुराचे पाणी आलेल्या परिसरात पोलिसांनी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले आहेत. तरीही नागरिक, महिला मोठ्या संख्येने पुराचे पाणी पाहण्यासाठी बाहेर पडल्या होत्या.
नितीन कापडणीस, मनपा आयुक्त.