महापालिकेकडून विनामास्क २० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:42+5:302021-04-20T04:28:42+5:30

सांगली : शहरात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात महापालिकेच्या टास्क फोर्सकडून जोरदार कारवाई सुरू आहे. सोमवारी विनामास्क फिरणाऱ्यांना २० ...

Municipal Corporation takes action against 20 people without masks | महापालिकेकडून विनामास्क २० जणांवर कारवाई

महापालिकेकडून विनामास्क २० जणांवर कारवाई

Next

सांगली : शहरात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात महापालिकेच्या टास्क फोर्सकडून जोरदार कारवाई सुरू आहे. सोमवारी विनामास्क फिरणाऱ्यांना २० व्यक्तींवर कारवाई करत ३४०० चा दंड वसूल केला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार ही कारवाई केली.

महापालिका क्षेत्रात कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या आणि नियम तोडणाऱ्यावर कारवाईसाठी आयुक्त कापडणीस यांच्या सूचनेनुसार माजी सैनिकांची नेमणूक करून एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. यामध्ये लष्करातील निवृत्त जवानांचा समावेश आहे. क्षेत्रात ही टास्क फोर्स कोविड नियम न पाळणाऱ्यावर कारवाई करत आहे. आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या व्यक्तीवर या टास्क फोर्सने कारवाई केली आहे. सोमवारी या टास्क फोर्सने कोविड नियमांचे उल्लंघन करत विनामास्क फिरणाऱ्या २० व्यक्तींवर कारवाई करत त्यांच्याकडून ३४०० इतका दंडही वसूल केला आहे. टास्क फोर्सची ही कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे आणि कोविडची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.

Web Title: Municipal Corporation takes action against 20 people without masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.