महापालिकेकडून विनामास्क ३० जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:27 AM2021-04-16T04:27:23+5:302021-04-16T04:27:23+5:30
सांगली : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या टास्क फोर्सकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गुरुवारी विनामास्क फिरणाऱ्या ३० व्यक्तींवर कारवाई ...
सांगली : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या टास्क फोर्सकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गुरुवारी विनामास्क फिरणाऱ्या ३० व्यक्तींवर कारवाई करीत ३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
महापालिका क्षेत्रात कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या आणि नियम तोडणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार माजी सैनिकांची नेमणूक करून एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. यामध्ये लष्करातील निवृत्त जवानांचा समावेश आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या व्यक्तींवर या टास्क फोर्सने कारवाई केली. गुरुवारी या टास्क फोर्सने विनामास्क फिरणाऱ्या ३० व्यक्तींवर कारवाई केली. टास्क फोर्सची ही कारवाई अशीच सुरू राहणार असून, नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.