महापालिकेकडून तीन दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:14+5:302021-06-11T04:19:14+5:30
ओळी : शहरातील अत्यावश्यक सेवेत नसलेल्या तीन दुकानांवर गुरुवारी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. लोकमत न्यूज ...
ओळी : शहरातील अत्यावश्यक सेवेत नसलेल्या तीन दुकानांवर गुरुवारी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना नियमाचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवल्याबद्दल तीन जणांवर गुरुवारी महापालिकेने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांना चार वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सांगली शहरात अत्यावश्यक सेवेत नसतानाही काही आस्थापना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे आणि सहायक आयुक्त अशोक कुंभार यांच्यासह पोलीस पथकाने शहरातील तीन आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत संबंधित आस्थापनांकडून सात हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकात मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, वैभव कुदळे, महिला पोलीस कर्मचारी माया चव्हाण यांचा समावेश होता. शासनाने जाहीर केलेल्या अत्यावश्यक सेवेतील आस्थापनाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही आस्थापना उघडू नयेत, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त रोकडे यांनी दिला.