महापालिका कुपवाडमध्ये लवकरच तीन उद्याने उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:46+5:302021-09-10T04:32:46+5:30

कुपवाड : महापालिकेच्यावतीने कुपवाड शहरासह उपनगरामध्ये लवकरच तीन उद्याने उभारण्यात येणार आहेत. शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या उल्हासनगरमधील महावीर व्यायाम ...

Municipal Corporation will soon set up three parks in Kupwad | महापालिका कुपवाडमध्ये लवकरच तीन उद्याने उभारणार

महापालिका कुपवाडमध्ये लवकरच तीन उद्याने उभारणार

Next

कुपवाड : महापालिकेच्यावतीने कुपवाड शहरासह उपनगरामध्ये लवकरच तीन उद्याने उभारण्यात येणार आहेत. शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या उल्हासनगरमधील महावीर व्यायाम शाळेची खुली जागा, बुधगाव रस्त्यालगतच्या एकता काॅलनी आणि विद्यानगर वारणालीमधील गल्ली नंबर १ मधील खुली जागा या तीन जागेवर ही उद्याने उभी करणार आहोत, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांनी कुपवाड शहरातील महापालिकेच्या खुल्या भूखंडांवर अद्ययावत अशी उद्याने उभारण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील व महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कुपवाड शहरातील नियोजित जागेची पाहणी करून आराखडा तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार आयुक्त नितीन कापडणीस, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, आर्किटेक्ट वनिता नाईक, पुणे शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, शाखा अभियंता आलताफ मकानदार, अशोक कुंभार यांनी शहरातील तीनही जागेची पाहणी केली.

आयुक्त कापडणीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने प्लॅन तयार करून पाठविण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून शहरासह विस्तारित परिसरातील नागरिकांची प्रलंबित असलेली मागणी लवकरच पूर्णत्वास येणार असल्याची माहिती नगरसेवक माने यांनी दिली.

फोटो : ०९ कुपवाड १

ओळ : कुपवाडमधील मुख्य रस्त्यालगत असलेल्या महावीर व्यायाम शाळेजवळच्या खुल्या जागेची पाहणी आयुक्त नितीन कापडणीस यांनी केली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने आदी उपस्थित होते.

Web Title: Municipal Corporation will soon set up three parks in Kupwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.