वसुंधरा बचावासाठी महापालिकेची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:40+5:302021-01-16T04:31:40+5:30
सांगली : महानगरपालिकेकडून माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात सायकल रॅली काढून वसुंधरा बचावाचा संदेश देण्यात आला. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या ...
सांगली : महानगरपालिकेकडून माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात सायकल रॅली काढून वसुंधरा बचावाचा संदेश देण्यात आला. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली ही सायकल रॅली काढण्यात आली.
या रॅलीत वसुंधरा बचावाच्या घोषणा देण्यात आल्या. महापालिका मुख्यालयापासून या रॅलीला सुरूवात झाली. या रॅलीत स्थायी सभापती पांडुरंग कोरे, माजी प्रभाग सभापती ऊर्मिला बेलवलकर, नगरसेवक अभिजित भोसले, सागर घोडके, सहायक आयुक्त पराग कोडगुले, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, विकास पाटील, विजय पवार, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, वैभव कुदळे, महेश मदने यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील सायकलपटू आणि पर्यावरणप्रेमींनी सहभागी झाले होता. यावेळी वसुंधरा रक्षणाची शपथ देण्यात आली. महापालिकेचे क्रीडाधिकारी महेश पाटील आणि पर्यावरण अभियंता हृषिकेश किल्लेदार यांनी रॅलीचे आयोजन केले होते.