महापालिकेचे आपत्ती मित्र ॲप कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:34+5:302021-06-19T04:18:34+5:30
------- सांगलीत नदीच्या पातळीत घट सांगली : दोन दिवसांच्या पावसाने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी २२ फुटापर्यंत गेली होती. पण ...
-------
सांगलीत नदीच्या पातळीत घट
सांगली : दोन दिवसांच्या पावसाने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी २२ फुटापर्यंत गेली होती. पण पावसाचा जोर ओसरल्याने पाणी पातळीत घट झाली. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी २० फुटांवर आली होती.
--------
गटारीत प्लास्टिक बाटल्याचा खच (फोटो १८शीतल०१)
सांगली : पहिल्याच पावसाने शहराची दयनीय अवस्था झाली. त्यात गटारी, ड्रेनेज तुंबल्याने रस्त्यावर पाणी वाहत होते. महापालिकेने या गटारी, ड्रेनेजची स्वच्छता हाती घेतली. त्यातून प्लास्टिक व बाटल्यांचा खच बाहेर काढण्यात आला.
---------
संभाव्य पुराच्या भीतीने स्थलांतर
सांगली : कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढताच दोन वर्षांपूर्वीच्या महापुराच्या आठवणी जाग्या झाला. पूरपट्ट्यातील नागरिकांनी संभाव्य पुराच्या भीतीने स्थलांतरही सुरू केले आहे. काही कुटुंबांनी भाड्याने घरे घेतली आहेत.