पालिका महापौर, आयुक्त, नगरसेवक उतरले मैदानावर

By Admin | Published: February 14, 2016 12:50 AM2016-02-14T00:50:51+5:302016-02-14T00:50:51+5:30

वर्धापन दिन क्रीडा स्पर्धा; राजू गवळी, सुहास व्हटकर प्रथम

Municipality mayor, Commissioner, corporator landed on the field | पालिका महापौर, आयुक्त, नगरसेवक उतरले मैदानावर

पालिका महापौर, आयुक्त, नगरसेवक उतरले मैदानावर

googlenewsNext

सांगली : महापालिकेचे कारभारी, अधिकारी आणि कर्मचारी कामाचा ताण विसरून छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या लाल मातीत रमून गेले. राजकीय डावपेच आणि फायलींच्या ढिगाऱ्यातून अलगद बाजूला येत महापौर, आयुक्त व नगरसेवकांनी खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले. निमित्त होते महापालिका वर्धापनदिन क्रीडा स्पर्धेचे.
मनपाच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये कबड्डी, व्हॉलिबॉल, क्रिकेट, धावणे, चालणे आदी खेळांचा समावेश होता. मनपा क्रीडा विभागाने स्पर्धेचे आयोजन केले. मनपा क्रीडाधिकारी नितीन शिंदे यांनी संयोजन केले. पंच म्हणून मधुकर साळुंखे, विनायक विभुते, सुरेश चिखले, प्रशांत कोरे यांनी काम पाहिले. नगरसेवक राजू गवळी व घरपट्टी विभागातील लिपिक सुहास व्हटकर यांनी १०० मीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी क्रिकेटमध्ये जोरदार षटकार ठोकले. नगरसेविका आशा शिंदे व रोहिणी पाटील यांनी चालण्याची स्पर्धा गाजवली. नगरसचिव चंद्रकांत आडके व नूतन उपमहापौर विजय घाडगे यांनी धावणेत, तर सहायक आयुक्त टीना गवळी यांनी संगीत खुर्चीत बाजी मारली.
स्पर्धेचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अंतिम निकाल असा : १०० मीटर धावणे : पदाधिकारी गट : नगरसेवक राजू गवळी, उपमहापौर विजय घाडगे, नगरसचिव चंद्रकांत आडके. १०० मीटर धावणे : कर्मचारी गट : सुहास व्हटकर, अमित कांबळे, अमोल माने. २ कि.मी. चालणे : महिला : नगरसेविका सुनीता वाघमारे, रोहिणी पाटील, आशा शिंदे, संगीता खोत. २ कि.मी. चालणे : पुरूष : विजय कदम, सुनील कुंभार, अमोल माने. १ कि.मी. चालणे : अपंग : प्रदीप सावंत, तानाजी मदने, सुभाष केसरे. संगीत खुर्ची : प्रियांका जाधव, रोहिणी पाटील, टीना गवळी. रांगोळी : वर्षा भोकरे, सीमा पाटील, सुनीता वाघमारे. सांघिक स्पर्धा : कबड्डी : आयुक्त संघ (प्रथम), महापौर संघ (द्वितीय). क्रिकेट : आयुक्त संघ (प्रथम), पत्रकार संघ (द्वितीय). व्हॉलिबॉल : महापौर संघ (प्रथम), आयुक्त संघ (द्वितीय). विजेत्यांना महापौर हारूण शिकलगार यांच्याहस्ते सन्मानचिन्ह प्रदान केले. (प्रतिनिधी)

Web Title: Municipality mayor, Commissioner, corporator landed on the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.