मुनिश्री चिन्मयसागर ट्रस्टतर्फे उद्या कोरोना योद्धांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:55 PM2020-10-17T17:55:08+5:302020-10-17T17:56:26+5:30
Muncipal Corporation, coronavirus, sangli मुनिश्री चिन्मय सागर चॅरिटेबल ट्रस्ट व वर्ल्ड जैन डॉक्टर्स फोरम यांच्यावतीने कोरोनाशी लढा देणाऱ्या सामाजिक संस्था, डॉक्टर्स, समाजसेवक अशा कोरोना योद्धांना राष्ट्रीय पातळीचा ह्लचिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवॉर्ड २०२०ह्व देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
सांगली : मुनिश्री चिन्मय सागर चॅरिटेबल ट्रस्ट व वर्ल्ड जैन डॉक्टर्स फोरम यांच्यावतीने कोरोनाशी लढा देणाऱ्या सामाजिक संस्था, डॉक्टर्स, समाजसेवक अशा कोरोना योद्धांना राष्ट्रीय पातळीचा ह्लचिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवॉर्ड २०२०ह्व देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार समारंभ रविवार दि. १८ रोजी सकाळी १०:०० वाजता राजमती भवन येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याहस्ते देण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर, संयोजक सुरेश पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुमन लता जैन, सचिव अभिषेक मोदी, वर्ल्ड जैन डॉक्टर्स फोरमचे अध्यक्ष डॉ. सन्मती थोले उपस्थित राहणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, सुरेश पाटील, डॉ. सोमशेखर पाटील, डॉ. भरत मुडलगी, डॉ. जयधवल भोमाज, डॉ. महाधवल (मोहन) भोमाज, डॉ. शरद देसाई, डॉ. उमेश पाटील यांना चिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवार्डने सन्मानित करण्यात येणार आहे.
सतीश साखळकर, संजय बेले, असिफ बावा, हयात फाउंडेशन, पीर अली पुणेकर, डॉ. रविंद्र ताटे, दक्षिण भारत जैन सभा, अमोल पाटील, तानाजी पाटील, शशिकांत पाटील, राकेश दोडण्णावर, डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. संजय साळुंखे, नगरसेवक अभिजीत भोसले, डॉ. सुनील आंबोळे आदिंचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.