इस्लामपुरात डोक्यात दगड घालून गवंड्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:29 AM2021-03-09T04:29:44+5:302021-03-09T04:29:44+5:30

इस्लामपूर : इस्लामपूर-कापूसखेड रस्त्यावरील ओसवाल प्लॉट परिसरातून मदिना कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गवंड्याचा अज्ञातांनी डोक्यात दगड घालून खून केला. हा ...

Murder of a bricklayer by throwing a stone at his head in Islampur | इस्लामपुरात डोक्यात दगड घालून गवंड्याचा खून

इस्लामपुरात डोक्यात दगड घालून गवंड्याचा खून

Next

इस्लामपूर : इस्लामपूर-कापूसखेड रस्त्यावरील ओसवाल प्लॉट परिसरातून मदिना कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गवंड्याचा अज्ञातांनी डोक्यात दगड घालून खून केला. हा प्रकार मध्यरात्री ते पहाटेदरम्यान घडला. सोमवारी सायंकाळी मृताची ओळख पटविण्यात यश आले. राजेश सुभाष काळे (३५, रा. नेहरूनगर, इस्लामपूर), असे खून झालेल्याचे नाव आहे.

राजेश काळे मूळचा बावची येथील असून, गेल्या ३५-४० वर्षांपासून कुटुंबासह येथील नेहरूनगर परिसरात राहतो. सकाळी साडेसातच्या सुमारास सांगलीच्या पोलीस नियंत्रण कक्षातून या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काळे पालथा पडलेला होता. डोक्यात दगड घालण्यात आल्याने चेहरा विद्रूप झाला होता. मृतदेहाशेजारी पांढरी पेन्सील, मक्याचे कणीस, वांगे असे साहित्य पडलेले होते. काही अंतरावरील सिमेंटच्या दगडाला रक्त लागले होते. त्याच्या अंगावरील पँटसुद्धा रस्त्याच्या बाजूला पडली होती. त्यामुळे हल्लेखोर आणि त्याच्यामध्ये झटापट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

पोलिसांनी पेन्सिल आणि त्याच्या हातावर गोंदलेले ‘लक्ष्मी’ असे नाव यावरून माहिती घेतली. शहरातील अभियंत्यांशी संपर्क साधून शेवटी सायंकाळी मृताची ओळख पटविण्यात यश आले. घटनेची माहिती काळे याच्या कुटुंबाला देण्यात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर तपासाला गती मिळाली. मृत राजेशच्या मोबाइलमधील कॉलची माहिती घेत पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक या संशयितांकडे कसून चौकशी करीत होते. मात्र, रात्रीपर्यंत कोणतेही धागेदोरे हाती लागले नव्हते.

Web Title: Murder of a bricklayer by throwing a stone at his head in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.